Karnataka High Court: लग्नानंतर शारीरिक संबंध न ठेवणे क्रूरता नाही; हायकोर्टाची महत्वपूर्ण टिपण्णी

लग्नानंतर शारीरिक संबंध न ठेवणे क्रूरता नाही, अशी महत्वपूर्ण टिप्पणी कर्नाटक उच्च न्यायलायाने केली आहे.
Karnataka High Court
Karnataka High CourtSaam TV
Published On

Karnataka High Court News: लग्नानंतर शारीरिक संबंध न ठेवणे क्रूरता नाही, अशी महत्वपूर्ण टिप्पणी कर्नाटक उच्च न्यायलायाने केली आहे. एका पत्नीने तिच्या पतीविरोधात हायकोर्टात भादंवि कलम ४९८ अ अतंर्गत फौजदारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हायकोर्टाने महत्वपूर्ण टिप्पणी केली. (Latest Marathi News)

पत्नीने याचिकेत आरोप केला आहे की, पती सातत्याने आध्यात्मिक व्हिडिओ पाहत असल्याने लग्नानंतर शारीरिक संबंध प्रस्थापितच केले नाहीत. त्यामुळे हा प्रकार क्रूरता श्रेणीत येतो असं तिचं म्हणणं आहे. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्या. एम. नागप्रसन्न यांच्या एकल खंडपीठाने पती आणि आई-वडिलांनी दाखल केलेली याचिका स्वीकारली. या खंडपीठाने लग्नाच्या २८ दिवसानंतर दाखल केलेली पत्नीची याचिका रद्दबातल ठरवली आहे.

Karnataka High Court
Manisha Kayande News : मनिषा कायंदे यांची आमदारकी रद्द होणार? उज्ज्वल निकम यांनी सगळं उलगडून सांगितलं

पत्नीनं याचिकेत नेमकं काय म्हटलंय?

पत्नीने याचिकेत म्हटलं आहे की, 'माझा पती हा ब्रह्माकुमारी समाजाचा अनुयायी आहे. त्याला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात कोणतंही स्वारस्य नाही. पती ब्रह्माकुमारी समाजाचा अनुयायी आहे, तर तो लग्न न करण्याचा पर्याय निवडू शकला असता'.

कोर्टाने काय टिप्पणी केली?

कर्नाटक हायकोर्टाच्या खंडपीठानं म्हणणं आहे की, 'क्ररतेचा अर्थ म्हणजे एखाद्यासोबत जबरदस्तीनं एखादं आचरण करणं होयं. एखाद्या महिलेला आत्महत्या करण्यास भाग पाडणं होय किंवा जीवाला धोका निर्माण होईल असं कृती करणं होय. तसेच दुसरी बाब ही अत्याचारासंबंधी आहे. याचबरोबर यात एखादी बेकायदा मागणी ही जबरस्ती करणं हे असू शकतं'.

Karnataka High Court
Odisha Railway Accident Update: CBI चौकशीनंतर सिग्नल इंजीनिअर कुटुंबासह गायब; ओडिशा रेल्वे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

'भादंवि कलम ४९४ अ मध्ये पती किंवा त्याचे नातेवाईकांना शिक्षा करण्याचं प्रावधान आहे. या प्रकरणात महिलेसोबत क्रूरता केली गेली असेल तर हा गुन्हा सिद्ध होतो. मात्र, याचिकेत भादंवि कलम ४९४ अ या श्रेणीचा क्रूरता कोणताही घटक दिसत नाही. तर या प्रकरणात महिलेचे सासू-सासरे कधीच मुलासोबत राहिले नाही. तर सासू-सासरे हे मुलगा आणि सूनेसोबत एकाच घरात राहिले नाहीत. त्यामुळे सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल होऊ शकत नाही. जर या खटल्याला परवानगी दिल्यास कायद्याच्या प्रक्रियेचा होऊ शकतो, अशीही टिप्पणी कोर्टाने केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com