Rajasthan News: प्रियकर मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेला, घरात अचानक मुलीच्या वडिलांनी दोघांना रंगेहात पकडले अन् मग...

Rajasthan News Today: ही धक्कादायक घटना बारमेर जिल्ह्यातील समदरी पोलीस स्टेशन हद्दीतील माजल गावची आहे.
Crime News
Crime NewsSaam TV
Published On

Rajasthan Crime News: राजस्थानच्या बाडमेरमध्ये प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाची बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो तरुण रात्री त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता आणि यादरम्यान प्रेयसीच्या वडिलांनी दोघांना एकत्र पाहिले. (Latest Marathi News)

Crime News
Chandrapur News : दहा माजी नगरसेवकांनी चंद्रपूर मनपा प्रशासनास दिला 48 तासांचा अल्टिमेटम

दोघांना सोबत पाहून प्रेयसीच्या वडिलांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह रस्त्यालगतच्या झुडपात फेकून दिला. ही धक्कादायक घटना बाडमेर जिल्ह्यातील समदरी पोलीस (Police) स्टेशन हद्दीतील मजल गावची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समदरी येथील जेठंतारी गावात राहणारा 28 वर्षीय तरुण हा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी घरी आला होता आणि यादरम्यान प्रेयसीच्या वडिलांनी दोघांना एकत्र पाहिले. (Rajasthan News)

संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याचे मृतदेह झुडपात फेकून दिले. सकाळी रस्त्याच्या कडेला तरुणाचा मृतदेह आढळून येताच गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. 

Crime News
NCP Protest In Maharashtra : '50 खोके एकदम ओके' राष्ट्रवादीकडून गद्दार आणि खोके दिवस आंदोलन, मुंबईत पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

समदरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून एफएसएल टीमला पाचारण करून पुरावे गोळा केले आणि मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयाच्या (Hospital) शवागृहात ठेवला. मृत तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पिता आणि मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मृत तरुणाचे वडील यांनी सांगितले की, मुलीने आपल्या मुलाची फसवणूक करून त्याला पाळ्या घरी बोलावले. यानंतर बाप-लेकीने मिळून धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आणि मृतदेह झुडपात फेकून दिले.

दुसरीकडे, या हत्येबाबत समदरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मृत तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तरुणाच्या हत्येत तरुणीची भूमिका काय आहे, याचा देखील पोलीस तपास करत आहेत. पोलीस मृत तरुण आणि तरुणीचे कॉल डिटेल्स तपासत असून, त्यानंतर होत्याचा उलगडा होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com