Mumbai News: मागच्यावर्षी आजच्या दिवशी शिवसेनेत (Shivsena) मोठी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडत आपला वेगळा गट स्थापन केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठी उलथापालथ होऊन महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले.
शिंदे- फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरामध्ये गद्दार आणि खोके दिवस साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या या आंदोलनावेळी (NCP Protest) '50 खोके एकदम ओके' अशा घोषणा करत सरकारचा निषेध केला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक ताब्यात घेतले आहे. आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गद्दार दिनाच्या पार्शवभूमीवर मुंबई पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या होत्या. शिवसेनेच्या ठाकरे गटासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्या होत्या. आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला होता. अशामध्ये मुंबई पोलिसांनी आंदोलनापूर्वीच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी गद्दार आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतले आहे. दक्षिण विभागातील अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. आजपहाटे या सर्व शिवसैनिकांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. शिवसेना शाखेच्या खाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्ते आंदोलनासाठी येण्यास सुरुवात होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांसोबत वाद घालणाऱ्या दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे, उपनेते अरुण भाई दुधवडकर यांच्यासह काही शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली.
राज्यभरातही राष्ट्रवादीचे आंदोलन सुरु आहे. धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारविरोधात गद्दार आणि खोके दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत खोके दाखवत आणि त्यावर निषेदाचे मॅसेज झळकवत आंदोलन केले. यावेळी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरातील गोपाल टी इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून गद्दार दिवस साजरा करत निषेध करण्यात आला. 50 खोके रस्त्याच्या कडेला ठेवून हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे 50 खोके आणि त्यावर लिहिलेला मजकूर सर्वांचे आकर्षण ठरले. या आंदोलनावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर, नागपूरच्या व्हेरायटी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गद्दार आंदोलन करण्यात आले. 'हे सरकार पैशाच्या जोरावर आलं आहे', असा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खोके सरकार म्हणत निषेध केला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.