Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, २ दुचाकीची समोरासमोर धडक; ३ भावांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Bike Accident: उत्तरप्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ३ भावांचा जागीच मृत्यू झाला. दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, २ दुचाकीची समोरासमोर धडक; ३ भावांचा जागीच मृत्यू
Uttar Pradesh Bike AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात भीषण अपघात

  • दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तीन भावांचा मृत्यू

  • लग्नाला जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला

  • दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात भयंकर रस्ते अपघात झाला. दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन ३ भावांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ऐरायण मशायक गावाजवळ या अपघाताची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आणि गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हुसेनगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पत्राहा गावातील रहिवासी श्याम सिंग (४५ वर्षे), त्यांचा भाऊ मंथल सिंग (४० वर्षे), गोरेलाल (३२ वर्षे) आणि चुलत भाऊ राजेंद्र सिंग (३० वर्षे) हे सर्वजण सुलतानपूर घोष परिसरातील एका गावात लग्नाला दुचाकीवरून जात होते. चौघेही एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते. लग्न संध्याकाळचे होते त्यांना पोहचायला उशिर होईल त्यामुळे ते घाईत होते. दुचाकी वेगात चालवत होते. अशातच ऐरायण मशायक गावाजवळ त्यांच्या दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, २ दुचाकीची समोरासमोर धडक; ३ भावांचा जागीच मृत्यू
Kolhapur Accident: रस्त्यालगतच्या फलकाला दुचाकी धडकली, तरूण थेट झाडावर आपटला; जागेवरच मृत्यू, अपघाताचा भयंकर VIDEO

सुलतानपूर घोष पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गौती येथील रहिवासी मोतीलाल पासवान (५० वर्षे) हे दुसऱ्या मोटारसायकलवरून जात होते. श्याम सिंग आणि मोतीलाल पासवान यांच्या दुचाकीची धडक इतक्या जोरात झाली की चौघेही दूरवर फेकले गेले. दोन्ही दुचाकींचे तुकडे झाले. अपघाताचा आवाज ऐकून गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला होता तर अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले.

Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, २ दुचाकीची समोरासमोर धडक; ३ भावांचा जागीच मृत्यू
Accident CCTV Video: बाईक घसरली अन् डोकं थेट डंपरच्या चाकाखाली, कल्याण–मुरबाड रोडवर भयंकर अपघात

या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. श्याम सिंग, मंथल सिंग आणि गोरेलाल या तिघांचा मृत्यू झाला. तर राजेंद्र सिंग आणि मोतिलाल पासवान यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सिंग कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. ज्याठिकाणी मोठ्या उत्साहात लग्नाची तयारी सुरू होती त्याठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी करावी लागली.

Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, २ दुचाकीची समोरासमोर धडक; ३ भावांचा जागीच मृत्यू
Accident: नव्या कारने देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील ६ जण ठार, मृतांची नावे समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com