Kolhapur Accident: रस्त्यालगतच्या फलकाला दुचाकी धडकली, तरूण थेट झाडावर आपटला; जागेवरच मृत्यू, अपघाताचा भयंकर VIDEO

Kolhapur Accident CCTV Video: कोल्हापूरमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. रस्त्यालगच्या फलकाला दुचाकी धडकली. त्यानंतर तरुण झाडावर जाऊन आदळला. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
Kolhapur Accident: रस्त्यालगतच्या फलकाला दुचाकी धडकली, तरूण थेट झाडावर आपटला; जागेवरच मृत्यू, अपघाताचा भयंकर VIDEO
Kolhapur AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • हातकणंगले–कुंभोज मार्गावर भीषण अपघात

  • दुचाकी फलकाला धडकल्याने तरुणाचा मृत्यू

  • अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

  • अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. हातकणंगले–कुंभोज मार्गावर ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या फलकाला दुचाकी धडकली. त्यामुळे तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ही दुचाकी थेट झाडावर आदळली. या अपघातमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले–कुंभोज मार्गावर हा अपघात झाला. लक्ष्मी मंदिराजवळ रस्त्यालगत उभारलेल्या एका लॉजच्या फलकाला तरुणाच्या दुचाकीने धडक दिली. त्यानंतर तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि दुचाकी थेट झाडावर जाऊन आदळली. या अपघातामध्ये सौरभ अजित गाझी (२५ वर्षे) हा तरुण गंभीर जखमी झाला. जखमी सौरभला तात्काळ स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Kolhapur Accident: रस्त्यालगतच्या फलकाला दुचाकी धडकली, तरूण थेट झाडावर आपटला; जागेवरच मृत्यू, अपघाताचा भयंकर VIDEO
Accident : भरधाव कार कालव्यात कोसळली, नवरा बायकोचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, पैठणमध्ये भयंकर अपघात

सौरभ गाझी हा तरुण सांगलीच्या दूधगाव येथे राहत होता. गेली अनेक वर्षे तो कराडमध्ये मामाकडे राहत होता. रविवारी तो कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावाकडे आला होता. यावेळी हातकणंगलेवरून दूधगावकडे तो दुचाकीवरून जात होता. त्याचवेळी हा भयंकर अपघात झाला आणि या अपघातामध्ये सौरभ गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सौरभच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Kolhapur Accident: रस्त्यालगतच्या फलकाला दुचाकी धडकली, तरूण थेट झाडावर आपटला; जागेवरच मृत्यू, अपघाताचा भयंकर VIDEO
Bus Accident News : एक्स्प्रेस वेवर मृत्यूचं तांडव! ५० प्रवाशांना घेऊन जाणारी डबल डेकर बस उलटली

या अपघाताची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात करण्यात आली असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून व्हायरल होत आहे. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. रस्त्यालगत अनधिकृतरित्या लावलेले फलक आणि वेगमर्यादा न पाळणे यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Kolhapur Accident: रस्त्यालगतच्या फलकाला दुचाकी धडकली, तरूण थेट झाडावर आपटला; जागेवरच मृत्यू, अपघाताचा भयंकर VIDEO
Bus Accident News : ४४ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, १८ जणांचा मृत्यू , २६ जण जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com