Bus Accident News : ४४ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, १८ जणांचा मृत्यू , २६ जण जखमी

Nepal Bus Accident News : नेपाळमध्ये ४४ प्रवाशांना पोखराहून काठमांडूकडे घेऊन जाणारी प्रवासी बस नदीत कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला असून २६ जखमींवर उपचार सुरु आहेत. बचावकार्य अद्याप सुरू असून मृतांमध्ये परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.
Bus Accident News : ४४ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, १८ जणांचा मृत्यू , २६ जण जखमी
Nepal Kathmandu Bus Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • पोखराहून काठमांडूकडे जाणारी बस नदीत कोसळली

  • अपघातात १८ जणांचा मृत्यू, तर २६ जखमी

  • मृतांमध्ये परदेशी पर्यटकांचाही समावेश

  • बचावकार्यात अडथळे

नेपाळमधील काठमांडू येथे भीषण अपघात झाला आहे. धाडिंग जिल्ह्यातील गजुरीजवळ सोमवारी पहाटे एक प्रवासी बस त्रिशुली नदीत कोसळली. या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर २८ जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. याप्रकरणी अद्यापही रेस्क्यू ऑपरेशन सुरु असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच सोमवारी २३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्यासुमारास ४४ प्रवाशांना घेऊन पोखराहून काठमांडूकडे येणारी बस पहाटे १.३० वाजता काठमांडूपासून सुमारे ९० किमी पश्चिमेला पृथ्वी महामार्गावर धाडिंगमधील बेनीघाट रोरांग येथे पोहचली. यादरम्यान या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी बाजूलाच असलेल्या त्रिशुली नदीत कोसळली.

Bus Accident News : ४४ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, १८ जणांचा मृत्यू , २६ जण जखमी
Sambhajinagar Crime : गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचं गुढ उलगडलं, आईनेच काढला लेकीचा काटा; कारण ऐकून पायाखालची जमीन सरकेल

या दुर्घटनेत २६ प्रवासी जखमी झाले असून १८ जणांचा मृतदेह या नदीतून बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्यावेळी या बसमधून एकूण ४४ प्रवासी होते. जखमी झालेल्या २६ प्रवाशांना वाचवण्यात आले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. जखमी प्रवाशांना बोटीने सुमारे एक किलोमीटर अंतरावर आणण्यात आले, तेथून त्यांना रस्त्यावर नेण्यात आले आणि नंतर रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले.

Bus Accident News : ४४ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, १८ जणांचा मृत्यू , २६ जण जखमी
Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

रात्रीची वेळ, कठीण भूभाग आणि साहित्याचा अभाव यामुळे बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. या अपघातात ६ महिला आणि १२ पुरुषांचा मृत्यू झाला आहे. तर, जखमींमध्ये ७ महिला, १८ पुरुष आणि एका मुलीसह एकूण २६ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. अपघातस्थळी लष्कर, सशस्त्र पोलिस दल आणि नेपाळ पोलिसांच्या पथकांनी संयुक्त बचाव मोहीम सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com