

झारखंडमध्ये भीषण रस्ते अपघात
भरधाव कारला ट्रक आणि ट्रेलरची धडक
एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू
अपघातानंतर ट्रक आणि ट्रेलरचे चालक फरार
झारखंडमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. भरधाव कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्वजण एकाच कुटुंबातील होते. ही घटना शनिवारी रात्री हजारीबाग जिल्ह्यातील चौपारण येथील दनुआ घाटात झाला. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला. पोलिस सध्या अपघाताचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महेशपूर कोलियरी येथे राहणआरे शिव कुमार भुइयां आपल्या कुटुंबीयांसोबत कारने लग्न समारंभासाठी जात होते. वाटेतच या सर्वांवर काळाने घाला घातला. दनुआ घाटामध्ये चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कारने थेट ट्रेलरला धडक दिली. त्यानंतर या कारला पाठीमागून ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारचा चुराडा झाला. कारमध्ये असणाऱ्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर ट्रक आणि ट्रेलर चालक फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सर्व मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मृतदेहांचे तुकडे झाल्यामुळे ओळख पटवणे देखील कठीण झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी गेल्या चार दिवसांत पाचवी अपघाताची घटना घडली.
या अपघातामध्ये धनबाद येथील बुदौरा कॉलनीमध्ये राहणारे बीसीसीएल शिव कुमार भुइयां, त्यांची पत्नी रुबी देवी, मुलगी सोनी, सुहानी, प्रेम आणि त्याचे सासरे या सर्वांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे शिव कुमार भुइयां यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे ते राहत असलेल्या परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी ट्रक आणि ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.