Accident News : लाडक्या लेकीच्या लग्नावरून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Accident News : उत्तर प्रदेशात भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू. लेकीच्या लग्नावरून परतणाऱ्या कुटुंबाची स्कॉर्पिओ ट्रेलरला धडकल्याने मोठी दुर्घटना.
Accident News : लाडक्या लेकीच्या लग्नावरून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू
Uttar Pradesh Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • उत्तर प्रदेशात भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू

  • स्कॉर्पिओ गाडी ट्रेलरला धडकल्याने दुर्घटना

  • अतिवेगामुळे अपघात झाल्याची शक्यता

  • पोलीस तपास सुरू, ट्रेलर चालक फरार

  • लग्नावरून परतताना कुटुंबावर काळाचा घाला

उत्तर प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीच्या लग्नाहून परत येत असताना एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील दोहरीघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला असून या दुर्घटनेत ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. लाडक्या लेकीचे लग्न करून गोरखपूरला परतणाऱ्या एका कुटुंबाची चार चाकी गाडी कुसुम्हा-बशरतपूरजवळ अनियंत्रित होऊन एका ट्रेलरला धडकून हा अपघात झाला असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूरमधील खोराबार येथे राहणारं श्रीवास्तव कुटुंब हे आपल्या मुलीच्या लग्नासाठी रांची येथे गेले होते. विवाह सोहळा पार पडल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य परतले होते, मात्र श्रीवास्तव कुटुंब चारचाकी गाडीतून गोरखपूरकडे रवाना झाले होते. गाडीत दोन चालकही होते.

Accident News : लाडक्या लेकीच्या लग्नावरून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू
Crime News : कर्ज घेतल्याचा फायदा घेतला, पैसे फेडेपर्यंत महिलेवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार; कोल्हापूर हादरले

शनिवारी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास, वाराणसी-गोरखपूर चारपदरी महामार्गावर कुसुम्हा-बशारतपूरजवळ ही दुर्घटना घडली. भरधाव वेगात असलेली स्कॉर्पिओ गाडी अचानक अनियंत्रित झाली, प्रथम डिव्हायडरला धडकली आणि त्यानंतर विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसून समोरून येणाऱ्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओ गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

Accident News : लाडक्या लेकीच्या लग्नावरून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू
Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत गाडीत असलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला होता.अपघातानंतर ट्रेलरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. प्राथमिक तपासानुसार,अतिवेगामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रेलर जप्त केला असून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फरार चालकाचा शोध सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गोरखपूर आणि संबंधित गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com