कोल्हापुरात महिलेवर तीन वर्षे अत्याचार
कर्जाच्या पैशांचा गैरफायदा घेत ब्लॅकमेलिंग
अश्लील व्हिडिओद्वारे धमक्या
पीडितेने अखेर पोलिसांत तक्रार केली
आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, तपास सुरू
रणजित माजगावकर, कोल्हापूर
Kolhapur Women Rape Case News कोल्हापुरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. कर्जाच्या पैशांची परतफेड वेळेत न झाल्याचा गैरफायदा घेत एका नराधमाने महिलेवर तब्बल तीन वर्षे शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अश्लील व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंग करत हा अमानुष प्रकार सुरू होता. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
कोल्हापुरातील पीडित महिला एका सामाजिक संस्थेत आरोग्य सल्लागार म्हणून कार्यरत आहे. आर्थिक अडचणीमुळे २०२३ साली तिने आरोपी अमित सावंत याच्याकडून १० टक्के व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. काही काळ व्याजाची परतफेड केल्यानंतर आर्थिक अडचणी वाढल्या. याचाच गैरफायदा घेत आरोपीने महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली.
महिला घरी एकटी असताना आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला आणि त्याचे अश्लील चित्रीकरण केले. त्यानंतर या व्हिडिओच्या आधारे आरोपीने महिलेला ब्लॅकमेल करत हॉटेल आणि धावत्या कारमध्ये वारंवार अत्याचार केले. गेली तीन वर्षे हा प्रकार सुरू होता. पीडित महिलेने नोव्हेंबर २०२५ पर्यंत व्याजासह दोन लाख दहा हजार रुपये परत केले, तरीही केवळ २५ हजार रुपयांसाठी आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
एवढेच नाही, तर आरोपीने संबंधित व्हिडिओ कार मालकाला पाठवून महिलेची बदनामी केली. या सर्व त्रासाला कंटाळून आणि बदनामीच्या भीतीवर मात करत अखेर पीडितेने गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चौकशीत आरोपी हा चालक म्हणून काम करत असल्याचे समोर आले असून, महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत त्याने हा अमानुष प्रकार केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.अशा प्रकारच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.