'बिग बॉस मराठी ६' ची विजेता तन्वी कोलते ठरली.
तन्वी कोलतेने आपल्या लग्नाचे प्लान सांगितले आहे.
तन्वी प्रेमाबद्दल भरभरून बोलली.
'बिग बॉस मराठी ६' संपून आता काही दिवस झाले आहे. 'बिग बॉस मराठी ६'ची विजेता तन्वी कोलते ठरली. बिग बॉसनंतर तन्वी अनेक मुलाखती देताना दिसत आहे. ज्यामधून तिचा प्रवास उलगडला आहे. बिग बॉसच्या घरात सुरूवातीपासून ती चर्चेत होती, कधी आपल्या खेळासाठी तर कधी आपल्या वादग्रस्त विधानासाठी. तन्वी कोलते ही 'बिग बॉसची क्वीन' आणि 'टास्क क्वीन' म्हणून ओळखली जाते. तन्वीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक असतात. दरम्यान तन्वी कोलतेने आपल्या लग्नासंबंधात मोठा खुलासा केला आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या एका मुलाखतीत तन्वी कोलतेने आपल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. तन्वी म्हणाली की, "मला करिअरशी आधी लग्न करायचं आहे...मी घरात असताना बोले होते की, मी गेम शोमध्ये अफेअर करणार नाही. लव्ह अँगल देणार नाही...तीन महिन्यात मला कधीच प्रेम होऊ शकत नाही. त्यामुळे माझे आधीच ठरले होते की मी एकटी जाणार, एकटी खेळून बाहेर पडणार... माझी आई माझ्यासाठी मुलगा बघणार आहे. मला फटकळ, बोल्ड आणि बिनधास्त जरी लोक बोलत असतील तरी मी खूप जुन्या विचारांची आहे...माझी आई माझ्यासाठी जो मुलगा निवडेल त्याच्याशीच मी लग्न करेन. "
'बिग बॉस मराठी ६'च्या घरात असताना तन्वी कोमलतेचे नाव आयुष संजीवसोबत जोडले गेले होते. 'बिग बॉस मराठी ६'चा उपविजेता राकेश बापट ठरला. तन्वी आणि राकेशचे घरात चांगले नाते राहिले. दोघे एकमेकांना भाऊ-बहीण मानतात. तन्वी सध्या आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करताना दिसत आहे. चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
तन्वी कोलतेने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली. तन्वी कोलते ही मुळची कोकणातील रत्नागिरीची रहिवासी आहे. 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात येण्याआधी तन्वी कोलते 'लक्ष्मी निवास' या मालिकेत झळकली होती. तन्वी कोलते बिग बॉसच्या घरात 'काटा' गटाची सदस्य होती. आपला यशस्वी गेम खेळत तन्वी पहिली 'बिग बॉस मराठी ६' ची पहिली फायनलिस्ट बनली. तिने 'तिकिट टू फिनाले' जिंकले. बिग बॉसच्या घरात असताना रुचिता आणि तन्वीचे कायम खटके उडाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.