Shreya Maskar
'बिग बॉस मराठी ६ ' तन्वी कोलते जिंकली आहे. तन्वीने महाट्रॉफी उचलून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. तिला ट्रॉफीसोबत तब्बल १५ लाख रूपयांचे बक्षीस मिळाले आहे.
'बिग बॉस मराठी' 2018 पासून सुरू झाले. 2018 ते 2026 पर्यंत 'बिग बॉस मराठी'चे ६ सीझन थाटामाटात पार पडले. मेघा धाडेनंतर पुन्हा एका स्त्री स्पर्धकाने ट्रॉफी जिंकून रेकॉर्ड मोडला आहे. मेघा धाडेनंतर सलग ४ सीझन पुरुषांनी विजेतेपदामध्ये बाजी मारली.
'बिग बॉस मराठी १' ची विजेता मराठी अभिनेत्री मेघा धाडे झाली. पहिल्या पर्वाचे होस्टिंग महेश मांजरेकर यांनी केले.
शिव ठाकरे 'बिग बॉस मराठी २' चा विजेता ठरला. त्याला अनेक रिअलिटी शोमुळे खूप लोकप्रियता मिळाली. अलिकडेच शिव ठाकरेने 'The 50' हा शो जिंकला.
'बिग बॉस मराठी ३' चा विजेता मराठी अभिनेता विशाल निकम ठरला. विशाल निकम हा टिव्हीचा प्रसिद्ध अभिनेता आहे. याने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे.
अभिनेता अक्षय केळकरने 'बिग बॉस मराठी ४' वर आपले नाव कोरले. अक्षय केळकर अलिकडेच 'काजळमाया' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
गुलीगत सूरज चव्हाणने 'बिग बॉस मराठी ५' चे विजेतेपद भूषवले आहे. त्याने आपल्या 'झापुक झुपूक' स्टाइलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे.
'बिग बॉस मराठी ६' चा उपविजेता टिव्हीचा प्रसिद्ध अभिनेता राकेश बापट ठरला आहे. राकेश बापट आणि तन्वी कोलते दोघेही 'काटा' गटाचे होते.