प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन.
अभिनेत्याने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
अभिनेते अनेक काळापासून आजारी होते.
मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याने निधन झाले. प्रसिद्ध अभिनेते बिप्लब दासगुप्ता (Biplab Dasgupta) यांचे वयाच्या ७५ वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. चाहते आणि कलाकार मंडळींनी अभिनेत्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.
TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, बिप्लब दासगुप्ता यांचे दीर्घकालीन आजारानंतर शुक्रवारी निधन झाले. बिप्लब दासगुप्ता हे 'बाईशे श्रावण', 'गुमनामी' आणि 'झुल्फिकार' यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ बंगाली अभिनेते होते. तसेच ते प्रख्यात निवेदकही होते. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर दासगुप्ता यांना काही काळापासून आरोग्याच्या समस्या जाणवत होत्या. शुक्रवारी टॉलीगंजमधील गोल्फ क्लब रोड येथील त्यांच्या निवासस्थानी प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यानंतर दासगुप्ता यांना रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
काही काळापूर्वी प्रोस्टेटची शस्त्रक्रिया झाल्यापासून आजारी असलेल्या दासगुप्ता यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.दासगुप्ता यांनी 'केमिस्ट्री माशी', 'जोगोमाया अँड चेकमेड', 'बोसेपुकुर खुनखरापी' यांसारख्या टिव्ही मालिकांमध्येही आपल्या अभिनयाने मोठी लोकप्रियता मिळवली होती.बिप्लब दासगुप्ता हे बंगाली चित्रपट आणि टिव्हीचे एक सुप्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट भूमिकांमधून मनोरंजन विश्व गाजवले. ते १९९८ साली प्रदर्शित झालेल्या 'द बंगाली नाईट' या चित्रपटात दिसले. त्यानंतर त्यांनी १९९६ साली प्रदर्शित झालेल्या 'काहिनी' या मालिकेत काम केले. अनेक बंगाली टिव्ही मालिकांमधील आपल्या उत्कृष्ट कामामुळेही त्यांनी नाव कमावले होते.
बिप्लब दासगुप्ता यांचे पार्थिव 'टेक्निशियन्स स्टुडिओ'मध्ये नेण्यात आले असता चित्रपट, दूरचित्रवाणी आणि ओटीटी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना अखेरचा निरोप देत श्रद्धांजली वाहिली. बिप्लब दासगुप्ता यांच्या निधनाबद्दल बंगाली चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.