नंदुरबारमध्ये भीषण रस्ता अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
लग्नाच्या काही दिवसांवर असलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत
झायलो गाडीच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार
घटनेनंतर नागरिकांचा संताप, पोलिसांकडून तपास सुरू
सागर निकवडे, नंदुरबार
Nandurbar Rohit Bhil and Sajan Bhil Accident Case नंदुरबारमधून मन हेलवणारी बातमी समोर आली आहे. काही दिवसांवर लग्न असलेल्या तरुणावर काळाने घाला घातला. नंदुरबार-धानोरा मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या झायलो गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. रोहित आप्पा भिल आणि साजन भिल अशी मृतांची नावे आहेत. रोहित भिल याचे काही दिवसांवर लग्न होते. त्याच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रोहित आप्पा भिल या तरुणाचे अवघ्या दहा दिवसांवर लग्न ठरले होते. घरात लग्नाची लगबग सुरू होती, नातेवाईकांना निमंत्रणे देण्यासाठी तो आपल्या मित्र साजन भिल याच्यासह दुचाकीवरून निघाला होता. मात्र, नंदुरबार-धानोरा मार्गावरील लोय फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या झायलो गाडीने जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान रोहित आणि साजन या दोघांनीही प्राण गमावले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. संतप्त नागरिकांनी अपघातग्रस्त झायलो गाडीला आग लावली, त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.