Viral News: खाऊचं आमिष दाखवत होती तरुणी, संतापलेल्या हत्तीने केलं असं काही, Video पाहून तुमचाही श्वास अडकेल

Latest Viral Video: हा व्हिडिओ (Elephant Video) सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Elephant Viral Video
Elephant Viral VideoSaam Tv

Elephant Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून हे प्राणी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातात. जंगल सफारी करताना अनेक जण या प्राण्यांचे व्हिडिओ शेअर करत असतात. या सफारीवेळी प्राणीप्रेमी या प्राण्यांना खायला देखील देत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका प्राणीप्रेमी तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती हत्तीला खाऊ देत असते पण हत्ती तिच्यासोबत जे काही करतो हे पाहून तुमचाही श्वास अडकेल. हा व्हिडिओ (Elephant Video) सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Elephant Viral Video
Mumbai-Goa Express Way Traffic Jam: मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; भर उन्हात नागरिकांचे हाल; पाहा VIDEO

जंगलामधील महाकाय आणि शक्तिशाली प्राण्यांमध्ये हत्तीचे नाव सर्वात आधी घेतले जाते. हत्ती जितका शांत तितकाच तो बुद्धिमान प्राणी आहे. पण जर एखाद्याने त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो त्या व्यक्तीला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. एका पर्यटक तरुणीसोबत अशीच घटना घडली आहे. ही तरुणी या हत्तीला खायला केळी देत असते. पण ती फक्त त्याला केळी देण्याचे आमिष दाखवते. मग संतप्त झालेला हत्ती तिला सोंडेत उचलून फेकून देतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जंगलामध्ये एक हत्ती फिरत आहे. एक तरुणी हातामध्ये केळीचा घड घेऊन उभी राहिलेली दिसत आहे. ही तरुणी एक केळी हात्तीच्या तोंडापुढे नेते आणि परत मागे घेते. ती फक्त त्याला केळीचे आमिष दाखवताना दिसत आहे. हत्ती केळी खाण्यासाठी पुढे पुढे येतो पण ती तरुणी त्याला खायला काही देत नाही. त्यामुळे हत्तीला प्रचंड राग येतो. संतप्त झालेला हत्ती आपल्या सोंडेमध्ये उचलून या तरुणीला फेकून देतो.

Elephant Viral Video
Rajasthan Crime: बॅचलर राहणाऱ्या मुलींनो सावधान! फ्लॅट मालकाचं धक्कादायक कृत्य; सर्वत्र स्पाय कॅमेरा बसवला अन्...

Susanta Nanda याने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 68 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर 478 जणांनी हा व्हिडिओ रिट्वीट केला आहे. नेटिझन्सनी देखील या व्हिडिओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com