Rajasthan Crime: बॅचलर राहणाऱ्या मुलींनो सावधान! फ्लॅट मालकाचं धक्कादायक कृत्य; सर्वत्र स्पाय कॅमेरा बसवला अन्...

Rajasthan Crime News: आरोपी सीसीटीव्ही कॅमेरे फिट करण्याचं काम करतो. तसेच संगणकाचेही काम करतो.
Rajsthan Crime News
Rajsthan Crime NewsSaamtv
Published On

Udaipur News: राजस्थानच्या (Rajashtan) उदयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खोलीमध्ये स्पाय कॅमेरे बसवून तरुणींचे अश्लिल व्हिडिओ तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक केली असून आरोपी सीसीटीव्ही कॅमेरे फिट करण्याचं काम करतो. तसेच संगणकाचेही काम करतो. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडील मोबाईल आणि इतर सामान जप्त केलं आहे. (Latest Marathi News)

Rajsthan Crime News
Samruddhi Mahamarg News: आधी स्पीड, मग टायर फुटणे... आता 3 महिन्यांच्या अभ्यासानंतर समृद्धीवरील अपघातांचं नवं कारण आलं समोर

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, एका तरुणीने बोहरा गणेशजी मंदिर रोडवरील पार्थ कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट भाड्याने घेतला होता. राज सोनी याच्याकडून हा फ्लॅट भाड्याने घेतला होता. राज सोनी हा चितौडगडचा रहिवासी आहे. सध्या तो वर्धमान कॉम्प्लेक्स येथे राहतो. काही दिवसानंतर फ्लॅटची डागडुजी करायची असं सांगून हा तरुण फ्लॅटमध्ये आला होता.

याबाबत तरुणीने तात्काळ उदयपूरच्या प्रातपनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. ज्यामध्ये तिने फ्लॅटमधील इंटरनेट राऊटरद्वारे त्याच्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्याचा अॅक्सेस घेतला होता. दिवसभरातील फ्लॅटमधील हालचाली तो मोबाईलवर ऑनलाइन पाहायचा. त्याने हिडन कॅमेऱ्याने अनेक अश्लील व्हिडीओ त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते.

Rajsthan Crime News
Nana Patole News: 'आम्हाला फरक पडत नाही, सगळे प्लॅन तयार...' कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा?

तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आधी गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्याच्याकडील मोबाईल आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी राज हा संगणकाचे काम करतो. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचेही काम करतो. पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com