
सचिन कदम
Traffic Jam: शाळेला सुट्टी लागल्याने आणि कर्मचाऱ्यांना देखील शनिवार ते सोमवार अशा तीन सुट्ट्या आसल्याने अनेक नागरिक घराबाहेर फिरण्यासाठी पडले आहेत. यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. मुंबई -पुणेसह मुंबई-गोवा महामार्गावर देखील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. भर उन्हात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने नागरिकांचा जीव कासावीस झाला आहे. (Mumbai-Goa Express Way)
मुंबई- गोवा महामार्गावर माणगावमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. रस्ता अरुंद असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक प्रभावित झाली आहे. सुमारे 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
श्रीवर्धन, म्हसळा, पुणे जोड रस्ता, माणगाव बाजार पेठ आणि ST स्टँड याच परीसरात असल्याने वाहतूक कोंडीचा परिणाम अधिक जाणवत आहे. माणगाव शहरापासून तब्बल 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. सलग सुट्यांमुळे कोकणात गेलेले पर्यटक आणि चाकरमानी आता परतीच्या मार्गावर असल्याने देखील वाहतूक कोंडी होत आहे.
शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने खाजगी वाहनांमधून पर्यटनासाठी घराबाहेर पडल्याने काल सकाळपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रॅफिक जाम झाला होते.मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाल्याने खंडाळा घाट परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला होता.
सदरची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खंडाळा बोगदा परिसरात महामार्ग पोलिसांनी 10-10 मिनिटांचे ब्लॉक घेतले. तसेच मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने थांबवत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने सर्व सहा लेनवरून सोडली. यामुळे पुणे- मुंबई लेनवर देखील वाहतूक कोंडी झाली. तसेच आज मुंबई गोवा महामार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.