14 App Ban In India : केंद्र सरकारमार्फत परदेशी अॅपवर पुन्हा एकदा बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये पाकिस्तानमधील १४ मॅसेंजर अॅपचा समावेश आहे. आयटी मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये B chat या अॅपवर देखील बंदी घालण्यात आली आहे. इंटेलिजन्स ब्युरोने या संदर्भात माहिती दिली आहे. (Marathi News)
सध्या ऑनलाईन स्कॅमच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये नागरिकांचा पर्सनल डेटा चोरला जातोय. तसेच अन्य वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक होत आहे. फसवणूकीच्या अशा घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय.
काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील काही सोशल मीडिया अकाऊंटवर बंदी घालण्यात आली होती. तसेच आतापर्यंत विविध गेम अॅपवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. दहशतवादी या अॅपचा वापर करून पाकिस्तानात असलेल्या आपल्या मालकांशी संपर्क साधत होते.
बंदी घातलेले १४ अॅप कोणते
Bechat, Inigna, Cripwiser, SafeSwiss, Mediafire, Vikrama, Jangi, Briar, Conion, Nandbox, imo, Second Line आणि Element and Therma या अॅपवर भारतात केंद्र सरकारने बंदी घातली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.