Pune Crime News
Pune Crime NewsSaam tv

Raigad Tehsil Office: हृदयद्रावक! महाराष्ट्र दिनी तहसिल कार्यालयात कर्मचाऱ्याने संपवलं जीवन; आत्महत्येचं कारण काय?

Employee ended his life in the Tehsil Office: सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलीये.
Published on

सचिन कदम

Raigad News : रायगड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र दिनी तहसिल कार्यालयात एका कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलीये. (Raigad News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पोलादपुर तहसिल कार्यालयात ही घटना घडली आहे. गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव राजेंद्र केकान (वय वर्ष 30) असे आहे. राजेंद्र मुळचे बीड (Beed) येथे राहणारे होते.

Pune Crime News
Pune Crime News: पुणे हादरलं! भरदिवसा कोयत्याने वार करून ५० वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या, व्हिडीओ आला समोर

पोलादपुर तहसिल कार्यालयाच्या मुख्य लोखंडी दरवाजाला त्यांनी गळफास लावला. तहसिल कार्यालयातच त्यांनी आत्महत्या नेमकी का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्र दिनी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com