Pune Accident News: २ वर्षीय बाळाला वाचवायला बापानं पाण्यात उडी घेतली, दोघांचाही करूण अंत; पुण्यातील दुर्दैवी घटना

Pune Accident News: सदर घटनेमुळे परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
Pune Accident News
Pune Accident NewsSaam TV

Crime News : पुण्यातील शिरूर तालुक्यातील जांबुत येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कृषी पर्यटन केंद्रात बनवण्यात आलेल्या स्विमिंग टँकमध्ये बुडून बाप लेकाचा मृत्यू झालाय. सदर घटनेमुळे परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. (Accident News)

राजवंश गाजरे असं २ वर्षीय मृत चिमुकल्या मुलाचे नाव असून सत्यवान गाजरे असं मृत वडिलांचे नाव आहे. लहान मुलगा खेळता खेळता स्विमिंग टँकमध्ये पाय घसरून पडल्याने त्याला वाचवण्यासाठी वडील सत्यवान गाजरे गेले. दरम्यान स्विमिंग पुलाची खोली जास्त असल्याने आणि पोहता येत नसल्याने दोघांचाही स्विमींग टँकमध्ये बुडून मृत्यू झालाय.

Pune Accident News
Crime News: हृदयद्रावक! महाराष्ट्र दिनी तहसिल कार्यालयात कर्मचाऱ्याने संपवलं जीवन; आत्महत्येचं कारण काय?

त्यामुळे गाजरे कुटुंबावरती शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र दिनी तहसिल कार्यालयात कर्मचाऱ्याने संपवलं जीवन

आज रायगड येथे देखील एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका कर्मचाऱ्याने तहसील कार्यालयातच आत्महत्या केली आहे. तहसील कार्यालयाच्या गेटजवळ गळफास घेत त्या व्यक्तीने आपलं जीवन संपवलं आहे.

Pune Accident News
14 Messenger App Banned: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; १४ अ‍ॅपवर बंदी, तुम्ही वापरता का हे अ‍ॅप?

पोलादपूर तहसील कार्यालयात ही घटना घडली आहे. गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव राजेंद्र केकान (वय वर्ष 30) असे आहे. राजेंद्र मुळचे बीड (Beed) येथे राहणारे होते. तहसिल कार्यालयातच त्यांनी आत्महत्या नेमकी का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. महाराष्ट्र दिनी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com