निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; देशात राबवली जाणार SSR प्रक्रिया, कोणत्या ६ राज्यात होणार SSR

Election Commission Big Announcement SSR Process: निवडणूक आयोगाने ६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांची विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम जाहीर केलीय. ३० नोव्हेंबर रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, तर अंतिम मतदार यादी २१ जानेवारी २०२७ रोजी प्रकाशित केली जाईल.
Election Commission SSR 2026: Six States And Uts, Voter List Dates
Election Commission SSR 2026: Six States And Uts, Voter List Datessaam tv
Published On: 
Summary
  • निवडणूक आयोगाची सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत SSR प्रक्रिया जाहीर

  • विशेष संक्षिप्त पुनरीक्षण प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.

  • ३० नोव्हेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान दावे आणि हरकती नोंदवता येणार.

SIR प्रक्रियेला विरोध, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झालेले असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतलाय. देशातील सहा राज्यात SSR प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या राज्यांमध्ये २१ जानेवारी २०२७ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल.

भारतीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२७ ही पात्रता तारीख मानून, ६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्विलोकनासाठी (SSR) आदेश जारी केलाय. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, एसएसआर प्रक्रिया खालील ६ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, चंडीगड, दादरा नगर हवेली-दीव दमण, मिझोराम, ओडिशा, सिक्किम यांचा समावेश आहे.

तरुणांना आगाऊ अर्ज करण्याची संधी

आयोगाच्या म्हणण्यानुसार, या पुनरीक्षण मोहिमेत जे तरुण भविष्यात मतदान करणार आहेत, त्यांना आपले नाव नोंदवण्याची संधी आहे. जे व्यक्ती १ एप्रिल, १ जुलै किंवा १ ऑक्टोबर २०२७ रोजी १८ वर्षांच्या पूर्ण होत आहेत, त्या आतापासूनच आगाऊ अर्ज सादर करू शकतील. यामुळे नवीन मतदारांचा मतदार यादीत वेळेवर समावेश करणे सुलभ होईल. या महत्त्वपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेसे मनुष्यबळ आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून दिली जावीत.

Election Commission SSR 2026: Six States And Uts, Voter List Dates
INDIA Bloc Jan Mahabhiyog: मॉक संसदेत मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात जन महाभियोग प्रस्ताव सादर

जेणेकरून मतदार यादी पुनरीक्षणाचे काम वेळेवर आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ शकेल, असे निर्देश सुचना निवडणूक आयोगाने संबंधित सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना देण्यात आले आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, एसएसआर प्रक्रिया ज्या सहा राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये अरुणाचल प्रदेश, चंडीगड, दादरा नगर हवेली-दीव दमण, मिझोराम, ओडिशा, सिक्किम यांचा समावेश आहे.

या प्रक्रियेअंतर्गत १ जानेवारी २०२७ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जातील. यासह १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर २०२७ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारे तरुण आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आगाऊ अर्ज करू शकतील. ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल पुनरावलोकन पुनरिक्षण प्रक्रिया सुरू आहे.

तेथील SSR वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल. यामध्ये आंध्र प्रदेश, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मेघालय, नागालँड, दिल्ली, त्रिपुरा आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखमधील हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन एसएसआरच्या तारखा नंतर ठरवल्या जाणार आहेत.

Election Commission SSR 2026: Six States And Uts, Voter List Dates
CEC ज्ञानेश कुमारांना हटवता येणार का? निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात काय दिलं उत्तर?

काय आहे एसएसआर (Special Summary Revision) प्रक्रिया

'विशेष सारांश पुनरीक्षण' ही निवडणूक आयोगाद्वारे मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी राबवली जाणारी एक अधिकृत प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली जातात, तर मृत, स्थलांतरित किंवा बोगस मतदारांची नावे वगळली जातात. यासह मतदाराच्या नावात, पत्त्यात किंवा छायाचित्रात काही त्रुटी असल्यास, त्या या कालावधीत दुरुस्त केल्या जाऊ शकतात.

संपूर्ण एसएसआर वेळापत्रक:

मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण - २० नोव्हेंबर, २०२६

- एकात्मिक मसुदा मतदार यादीचे प्रकाशन - ३० नोव्हेंबर, २०२६

- दावे आणि आक्षेप कालावधी - ३० नोव्हेंबर, २०२६ ते ३० डिसेंबर, २०२६

- अंतिम मतदार यादीचे प्रकाशन - २१ जानेवारी, २०२७

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.