INDIA Bloc Jan Mahabhiyog: मॉक संसदेत मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात जन महाभियोग प्रस्ताव सादर

Mock Parliament in Delhi: नवी दिल्लीत इंडिया आघाडीकडून आयोजित मॉक संसदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात प्रतीकात्मक जन महाभियोग प्रस्ताव सादर करण्यात आला. मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी केली.

'इंडिया' आघाडीने नवी दिल्लीत मॉक संसद भरवत तेथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात महाभियोग सादर केलाय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या कार्यक्रमात सुमारे २१ विरोधी पक्ष सहभागी झालेत. लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार या संपूर्ण कामकाजाचे अध्यक्षपद भूषवलं.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा, अशी मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. विरोधी पक्ष मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरावृत्ती' प्रक्रिया आणि निवडणुकीतील कथित अनियमिततांबाबत विरोधीपक्षाकडून आंदोलन केले जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.