ED raid on Harish Rawat former OSD Chandan Singh Jina : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ED ने रावत यांचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) आणि निकटवर्तीय चंदन सिंग जिना यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत ईडीच्या हाती तब्बल ३२ लाख रुपयांची रोख रक्कम (कॅश), २०० ग्रॅम सोने आणि लाखो रुपये किमतीची महागडी घड्याळे लागली आहेत.
या मोठ्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पक्षाच्या प्रतिमेवर याचा परिणाम होऊ नये, यासाठी हरिश रावत यांनी काँग्रेसमधील आपल्या दोन महत्त्वाच्या पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
उत्तराखंड अधीनस्थ सेवा निवड आयोगाच्या (UKSSSC) २०१६ मधील ग्राम पंचायत विकास अधिकारी (VPDO) भरती परीक्षेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी ED ने गुरूवारी ही कारवाई केली. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, २०१६ च्या व्हीपीडीओ (VPDO) परीक्षेतील उत्तरपत्रिकांशी (OMR sheets) छेडछाड करण्यात आली होती. उमेदवारांकडून मोठी रक्कम घेऊन परीक्षेचा निकाल बदलल्याचा आणि गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणावर आहे.
चंदन सिंग जीना हे २००९ ते २०१७ या काळात हरीश रावत मुख्यमंत्री असताना त्यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणूनही कार्यरत होते. २०१६ मधील ग्राम पंचायत विकास अधिकारी (VPDO) भरती घोटाळ्याच्या तपासादरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली. परीक्षेच्या उत्तरपत्रिका (OMR Sheets) सुरक्षित ठिकाणाहून तत्कालीन सचिवांच्या घरी नेऊन त्यात फेरफार केल्याचा आरोप या प्रकरणात आहे.
छापेमारीत नेमके काय काय सापडले?
जीना यांच्या घरातून ३२ लाखांची बेहिशोबी रोख रक्कम जप्त करण्यात आली. २००.५ ग्रॅम सोने सापडले. त्यामध्ये १३ सोन्याची नाणी आणि ७ सोन्याच्या साखळ्यांचा समावेश आहे. 'रोलेक्स', 'राडो', 'पियाजे', 'मोवाडो', 'टिसॉट' आणि 'कॅसिओ' यांसारख्या जगप्रसिद्ध आणि अत्यंत महागड्या ब्रँडची १२ घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या या सर्व वस्तूंची सुरुवातीची किंमत १ कोटी २८ लाख रुपये सांगण्यात येत असून, काही घड्याळांची किंमत मोजणे अद्याप बाकी आहे.
बँक खाती केली सील
ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करत चंदन सिंग जीना आणि त्यांच्या कुटुंबाची बँक खाती फ्रीज (सीलबंद) केली आहेत. या खात्यांमध्ये ५२ लाख १६ हजार रुपये जमा होते. याशिवाय जीना यांचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. त्यांनी केलेला मोठा रोकड खर्च आणि मिळालेली मालमत्ता त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या साधनांशी जुळत नसल्याचे ईडीचे म्हणणे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.