असंघटित व्यवसायात महाराष्ट्र पिछाडीवर; टॉप १० मध्ये एकाही जिल्हा नाही, केंद्र सरकारची धक्कादायक आकडेवारी

Maharashtra unorganized sector data : केंद्र सरकारच्या ASUSE 2025 जिल्हानिहाय आकडेवारीनुसार असंघटित आस्थापनांच्या टॉप १० जिल्ह्यांत महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्याचा समावेश नाही. पुणे रोजगाराच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर, तर सातारा प्रति कामगार उत्पन्नात देशात दुसऱ्या स्थानी आहे.
Maharashtra unorganized sector data
Maharashtra unorganized sector dataSaam TV
Published On

Maharashtra unorganized sector district wise data : केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) नुकताच एक अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, देशातील असंघटित उद्योगांच्या (छोटे व्यवसाय व दुकाने) टॉप १० जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्याचा समावेश नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या यादीत पश्चिम बंगालमधील सर्वाधिक ६ जिल्हे, तेलंगणातील रंगारेड्डी, उत्तर प्रदेशातील प्रयागराज, तसेच गुजरातमधील सुरत आणि अहमदाबाद या जिल्ह्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. ५ लाखांपेक्षा जास्त असंघटित उद्योग असलेल्या महाराष्ट्रातील केवळ पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीनच जिल्ह्यांचा या सर्वेक्षणात उल्लेखनीय उल्लेख आढळतो. केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने देशभरातील ७५७ जिल्ह्यांमधील असंघटित आस्थापनांची माहिती प्रसिद्ध केली आहे.

पश्चिम बंगाल, तेलंगणा, गुजरात अन् युपीचा डंका

असंघटित आस्थापनांच्या संख्येनुसार पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्हा १६ लाख ५९ हजार ६२६ आस्थापनांसह देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

टॉप १० जिल्ह्यांमधील असंघटित आस्थापनांची संख्या:

  • उत्तर २४ परगणा (पश्चिम बंगाल): १६,५९,६२६

  • दक्षिण २४ परगणा (पश्चिम बंगाल): १०,२९,८४७

  • कोलकाता (पश्चिम बंगाल): ८,८४,४३५

  • सुरत (गुजरात): ८,५१,३९८

  • अहमदाबाद (गुजरात): ७,३०,३४७

  • मुर्शिदाबाद (पश्चिम बंगाल): ७,०५,२३८

  • रंगारेड्डी (तेलंगणा): ६,९२,६३३

  • हावडा (पश्चिम बंगाल): ६,७३,७३३

  • नादिया (पश्चिम बंगाल): ६,६९,४३२

  • प्रयागराज (उत्तर प्रदेश): ६,३१,५३१

महाराष्ट्रातील पुणे जिल्हा या टॉप १० यादीत नसला, तरी तेथे ६ लाख ६४३ असंघटित आस्थापना आहेत. याशिवाय मुंबई उपनगरात ५ लाख ९१ हजार २९४, तर ठाणे जिल्ह्यात ५ लाख ९० हजार ९१४ असंघटित आस्थापना कार्यरत आहेत.

Maharashtra unorganized sector data
Maintenance Rules : सोसायटीचा मेंटेनन्स बुडवताय? मग थेट तुमचा फ्लॅट, गाडी आणि टीव्ही जप्त होणार, पाहा नियम

रोजगाराच्या बाबतीत पुणे देशात चौथ्या क्रमांकावर

असंघटित आस्थापनांच्या संख्येत पुणे जिल्हा टॉप १० मध्ये नसला, तरी रोजगार देण्याच्या बाबतीत पुणे देशात चौथ्या क्रमांकावर आहे.

उत्तर २४ परगणा (पश्चिम बंगाल): २१,२५,१६२ रोजगार

सुरत (गुजरात): १७,३७,०२७ रोजगार

रंगारेड्डी (तेलंगणा): १६,८९,८५४ रोजगार

पुणे (महाराष्ट्र): १२,६८,६१७ रोजगार

प्रति कामगार उत्पन्नात साताऱ्याचा देशात दुसरा क्रमांक

व्यवसायातून मिळणाऱ्या प्रति कामगार वार्षिक उत्पन्नात (GVA) महाराष्ट्रातील सातारा जिल्हा देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. साताऱ्यात प्रति कामगार वार्षिक उत्पन्न ₹८,७०,२४४ इतके आहे. या यादीत केवळ पुदुच्चेरी (₹२४,७७,४७७) हा केंद्रशासित प्रदेश साताऱ्याच्या पुढे आहे.

Maharashtra unorganized sector data
राजकारणात मोठा भूकंप! काँग्रेसला जोरदार धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचा २ महत्त्वाच्या पदांचा तडकाफडकी राजीनामा

महिला उद्योजकतेत ईशान्य भारत आघाडीवर

देशातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला कामगार असलेल्या २४ जिल्ह्यांपैकी २० जिल्हे तेलंगणा, मणिपूर, मेघालय आणि मिझोराममधील आहेत. तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात सर्वाधिक ७८.४१% महिला कामगार आहेत (येथे बिडी कामगार महिलांची संख्या मोठी आहे). मिझोराममधील सर्वच्या सर्व ८ जिल्ह्यांमध्ये लहान उद्योग आणि दुकानांची मालकी ५० टक्क्यांहून अधिक महिलांच्या हाती आहे. ईशान्य भारतातील मातृसत्ताक व महिलाकेंद्री समाजव्यवस्थेमुळे हे चित्र दिसत असल्याचे मानले जाते.

Maharashtra unorganized sector data
राजकीय वर्तुळात खळबळ! मराठा आंदोलकांचा लक्ष्मण हाकेंवर हल्ला, सोलापुरातील हॉटेलमध्ये नक्की काय घडलं?

महाराष्ट्रात तीव्र प्रादेशिक असमतोल

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) 'ASUSE २०२५' जिल्हास्तरीय अहवालातून महाराष्ट्रातील असंघटित क्षेत्रात मोठा प्रादेशिक असमतोल स्पष्ट झाला आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी केवळ पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांतच महाराष्ट्रातील एकूण असंघटित आस्थापनांपैकी सुमारे २७% दुकाने व उद्योग एकवटले आहेत.

राज्यातील बिगर-कृषी असंघटित क्षेत्रातील १ कोटी १७ लाख कामगारांपैकी तब्बल ३६ लाख कामगारांना याच तीन जिल्ह्यांत रोजगार मिळतो. याउलट सिंधुदुर्ग (७५,६०९), गडचिरोली (८६,७३८) आणि नंदुरबार (८८,५१५) या जिल्ह्यांमध्ये रोजगाराची संख्या पुण्याच्या तुलनेत १३ ते १७ पट कमी आहे. सातारा जिल्ह्यात प्रति कामगार उत्पन्न ₹८,७०,२४४ आहे, तर रत्नागिरीत ते अवघे ₹१,०९,४०० इतके आहे (तब्बल ८ पट फरक).

वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांत प्रति कामगार उत्पन्न ₹१.२ लाख ते ₹१.३४ लाखांच्या दरम्यान असून, ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा (₹१,५६,५३९) कमी आहे. याउलट पुणे, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com