राजकीय वर्तुळात खळबळ! मराठा आंदोलकांचा लक्ष्मण हाकेंवर हल्ला, सोलापुरातील हॉटेलमध्ये नक्की काय घडलं?

Laxman Hake Solapur hotel clash latest news : लक्ष्मण हाके आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हाके यांनी हल्ल्याचा आरोप केला, तर मराठा क्रांती मोर्चाने पलटवार करत CCTV फुटेज तपासण्याची मागणी केली आहे.
Laxman Hake Solapur hotel clash latest news
Laxman Hake Solapur hotel clash latest news
Published On

भरत नागणे, पंढरपूर प्रतिनिधी

Laxman Hake, Maratha Kranti Morcha : ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते यांच्यात सोलापूरजवळील एका हॉटेलमध्ये जोरदार वाद आणि झटापट झाल्याची घटना समोर आली आहे. जालन्याहून सांगोल्याकडे जाताना हॉटेलवर थांबल्यानंतर राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोन्ही बाजूंच्या या परस्परविरोधी दाव्यांनंतर आता सोलापूर पोलीस CCTV फुटेजच्या आधारे नेमकी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माझ्यावर भ्याड हल्ल्याचा प्रयत्न - लक्ष्मण हाके

लक्ष्मण हाके हे जालन्याहून सांगोल्याकडे जात असताना सोलापूरजवळील 'निसर्ग' हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. या वेळी काही तरुणांनी तेथे येऊन "मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणाला विरोध का करतोस?" असा जाब विचारत हुल्लडबाजी केली आणि हल्ल्याचा प्रयत्न केला, असा दावा हाके यांनी केला.

तसेच, हॉटेलच्या पार्किंगमध्ये दारूच्या नशेत असलेल्या या तरुणांनी गाडी आडवी घालून पुन्हा झटापट केल्याचे त्यांनी सांगितले. "मनोज जरांगे यांच्या चिथावणीवरूनच लातूर जिल्ह्यातील चाकूरचे हे तरुण आले होते. अशा भ्याड हल्ल्यांना आम्ही भीक घालत नाही; ओबीसी आरक्षणाची लढाई सुरूच राहील," असे हाके म्हणाले. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Laxman Hake Solapur hotel clash latest news
Pune : पुण्यात खळबळ! विद्यानंद बापाटांनी पाठवली थेट प्रशासनाला कडक नोटीस, 'या' ३ गोष्टींवर बंदीची मागणी

मराठा क्रांती मोर्चाचा पलटवार:

दुसरीकडे, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी हाके यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "लक्ष्मण हाके यांनी स्वतः दारूच्या नशेत दोन तरुणांना मारहाण केली आहे, ज्यामध्ये एका धनगर समाजाच्या तरुणाचाही समावेश आहे," असा खळबळजनक आरोप डोंगरे यांनी केला.

डोंगरे यांच्या दाव्यानुसार, चाकूर येथील प्रकाश सोमवंशी (मराठा) आणि चंद्रकांत (धनगर) हे तरुण मुंबईला जात असताना जेवणासाठी हॉटेलमध्ये थांबले होते. त्यांनी हाकेंना फक्त "मराठा आरक्षणाला विरोध करू नका" एवढेच सांगितले. मात्र, आंदोलने अपयशी ठरल्याच्या नैराश्यातून हाकेंनी आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी व SPO कर्मचाऱ्यांनी या तरुणांना पाडून-पाडून मारहाण केली.

Laxman Hake Solapur hotel clash latest news
राजकारणात मोठा भूकंप! काँग्रेसला जोरदार धक्का, माजी मुख्यमंत्र्यांचा २ महत्त्वाच्या पदांचा तडकाफडकी राजीनामा

CCTV फुटेज तपासण्याची मागणी

स्वतःचे पोलीस संरक्षण टिकवण्यासाठी हाके यांनी 'माझ्यावर हल्ला झाला' असा खोटा स्टंट रचल्याचा आरोप महेश डोंगरे यांनी केला आहे. सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांनी 'निसर्ग' हॉटेलचे रात्रीचे CCTV फुटेज तपासून लक्ष्मण हाके यांच्यावरच थेट गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com