आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्याला ED ने केली अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Ed Arrests Aap Leader Deepak Singla 155 Crore Bank Fraud: ईडीने आम आदमी पक्षाचे नेते दीपक सिंगला यांना 155 कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात गोवा आणि दिल्लीतील ठिकाणी छापे टाकण्यात आले असून तपास सुरू आहे.
ED arrests AAP leader Deepak Singla in connection with a ₹155 crore bank fraud case after raids in Delhi and Goa.
ED arrests AAP leader Deepak Singla in connection with a ₹155 crore bank fraud case after raids in Delhi and Goa.saam tv
Published On

प्रवर्तन निदेशालय (ED) ने सोमवारी आम आदमी पक्षाचे नेते दीपक सिंगलायांना 155 कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. महेश टिंबर प्रयव्हेट लिमिटेडशी संबंधित 155 कोटी रुपयांच्या बँक घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

ED arrests AAP leader Deepak Singla in connection with a ₹155 crore bank fraud case after raids in Delhi and Goa.
Sanjay Raut on Devendra Fadanvis | मोदी शाहांना गुजरातला पाठवू - राऊत | Marathi News

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने आज सकाळी दीपक सिंग, महेश सिंग आणि अमरिका गिल यांच्याशी संबंधित असलेल्या गोवा आणि दिल्लीतील सात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. छाप्यांदरम्यान सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे दीपक सिंग यांना अटक करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण महेश टीबर प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध दाखल झालेल्या 155 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणाशी संबंधित आहे.

ED arrests AAP leader Deepak Singla in connection with a ₹155 crore bank fraud case after raids in Delhi and Goa.
Rahul Gandhi In Thane News | राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज ठाण्यात | Marathi News

ED च्या म्हणण्यानुसार संबंधित कंपन्या आणि व्यक्तीनी बँकांची फसवणूक करून मोठी रक्कम हडप केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपक सिंग यांचा या घोटाळ्यात थेट सहभाग असल्याचा आरोप आहे. तसेच या प्रकरणात महेश सिंगला अमरिका गिल यांची नावेही समोर आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com