Rajasthan Election: राजस्थान निवडणुकीच्या तारखेत बदल, आता 23 नोव्हेंबरला नाही तर 'या' दिवशी होणार मतदान

Rajasthan Assembly Election 2023: राजस्थान निवडणुकीच्या तारखेत बदल, आता 23 नोव्हेंबरला नाही तर 'या' दिवशी होणार मतदान
Rajasthan Assembly Election 2023
Rajasthan Assembly Election 2023Saam Tv
Published On

Rajasthan Assembly Election 2023:

निवडणूक आयोगाने राजस्थान निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. यापूर्वी 23 नोव्हेंबर ही मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली होती. आता यात बदल करण्यात आला आहे. आता 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

तारखेत बदल करण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती. कारण देवउठनी एकादशी 23 तारखेला आहे आणि त्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात विवाह होऊ शकतात. हे लक्षात घेऊन तारखा बदलण्यात आल्या आहेत.

Rajasthan Assembly Election 2023
Maharashtra Politics: 'राज्यात 19 हजार 553 महिला बेपत्ता, अशा प्रश्नांवर गप्प बसायचं का?', सरकारवर शरद पवार कडाडले

निवडणूक आयोगाने सोमवारी राजस्थानसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान पाच राज्यांमध्ये मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. (Latest Marathi News)

Rajasthan Assembly Election 2023
Shirdi News: शिर्डीत साईंचे थेट होणार दर्शन, पासचा काळाबाजार थांबणार; साई संस्थानने घेतला महत्वपूर्ण निर्णय...

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राजस्थानमधील अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी 23 नोव्हेंबरबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, 23 नोव्हेंबरला अनेक लग्ने आहेत, त्यामुळे त्यांना मतदानात अडचण येणार आहे.

यावर निवडणूक आयोगाने सांगितले की, “मतदानाच्या तारखेत बदल करण्याबाबत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि मीडिया प्लॅटफॉर्मवरून मागणी करण्यात येत होती.'' ते म्हणाले की, मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लग्नसराई होते. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे मतदानादरम्यान मतदारांचा सहभाग कमी होऊ शकतो.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com