Shirdi News: शिर्डीत साईंचे थेट होणार दर्शन, पासचा काळाबाजार थांबणार; साई संस्थानने घेतला महत्वपूर्ण निर्णय...

Shirdi Saibaba Temple News: शिर्डीत साईंचे थेट होणार दर्शन, पासचा काळाबाजार थांबणार; साई संस्थानने घेतला महत्वपूर्ण निर्णय...
Shirdi Saibaba Temple News
Shirdi Saibaba Temple NewsSaam Tv

>> सचिन बनसोडे

Shirdi Saibaba Temple News:

साई दर्शनाच्या नावाखाली सुरू असलेला सशुल्क दर्शन पासचा काळाबाजार रोखण्यासाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने पास व्यवस्थेत महत्वपूर्ण बदल केले आहेत. आरती पास काढण्यासाठी यापुढे संबंधित व्यक्तीसह त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्वच लोकांच्या ओळखपत्रांची नोंद करणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

काही एजंट साई संस्थान आणि भाविकांची दिशाभूल करून वाढीव दराने आरती पास विकत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानंतर साई संस्थानने हा निर्णय घेतला आहे.

Shirdi Saibaba Temple News
Maharashtra Politics: 'राज्यात 19 हजार 553 महिला बेपत्ता, अशा प्रश्नांवर गप्प बसायचं का?', सरकारवर शरद पवार कडाडले

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून दररोज हजारो भक्त येत असतात. झटपट दर्शन आणि सशुल्क आरती पास काढून देण्याच्या नावाखाली शिर्डीत काहीजण गोरखधंदा करत असल्याचं समोर आलं आहे.  (Latest Marathi News)

त्यावर नियंत्रण यावे आणि भक्तांची होणारी लूट थांबावी यासाठी साईबाबा संस्थानने पास वितरण नियमात महत्वपूर्ण बदल केले असून आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य केले आहे.

Shirdi Saibaba Temple News
Bareilly Crime: अमानुषपणे छळ करून अल्पवयीन मुलीची हत्या; थरारक घटनेनं बरेली हादरलं

दरम्यान, सामान्य दर्शन रांगेतून दर्शन घेण्यासाठी कुठल्याही पासची आवश्यकता नाही. मात्र पेड पास दर्शन किंवा आरती पास घ्यायचा असेल तर ओळखपत्र हे अनिवार्य असणार आहे. यासाठी तिरुपती बालाजीच्या धरतीवर नवीन सॉफ्टवेअर साईबाबा संस्थानने कार्यान्वित केले असून नवीन निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. साईभक्तांच्या सुरक्षेसाठी देखील हा नवीन बदल महत्वाचा मनाला जातोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com