Bareilly Crime: अमानुषपणे छळ करून अल्पवयीन मुलीची हत्या; थरारक घटनेनं बरेली हादरलं

Uttar Pradesh: मृतावस्थेत असताना तरुणीच्या तोंडात माती टाकण्यात आली होती. तसेच तिच्या डोळ्यांवर उसाने मारहाण करण्यात आली होती.
Bareilly Crime
Bareilly CrimeSaam Tv
Published On

Uttar Pradesh Crime:

उत्तर प्रदेशच्या बरेली येथे एका १३ वर्षीय मुलीची निघृण हत्या करण्यात आलीये. उसाच्या शेतात पोलिसांना पीडितेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनास पाठवला आहे. पीडितेच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

Bareilly Crime
Mira Road Crime News: चार मजली बिल्डिंग बांधून पाचव्या मजल्यावरची घरे विकली; बोगस बिल्डरचा पर्दाफाश

निघृण हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मृत तरुणी बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केल्यावर लखीमपूर खेरी जिल्ह्यातील एका गावात ती उसाच्या शेतात मृतावस्थेत आढळून आली. तरुणी मृत अवस्थेत सापडली तेव्हा तिच्या तोंडात माती टाकण्यात आली होती. तसेच तिच्या डोळ्यांवर उसाने मारहाण करण्यात आली होती.

शवविच्छेदन करणाऱ्या पथकातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या शरीरावर एकूण ७ खोल जखमा आहेत. तसेच तिच्या प्रायव्हेट पार्ट्सजवळही जखमा आहेत. पीडितेवर लैंगिक अत्याचार झाले असल्याची शक्यता आहे.

पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरूवात केली आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत घटनेबाबत तक्रार दिली आहे. यासह संशयितांची नावे दिलीत. पोलिसांनी आरोपींवर गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सध्या त्यांच्यावर पाळत ठेऊन आहे. या प्रकरणी अधिक तपासासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांचे वेगळे पथक नेमण्यात आले आहे.

Bareilly Crime
Nanded Crime News: विमा एजंट बनून आला अन् महिलेच्या घरात शिरला; मारहाण करत सोन्याचे दागिने, मोबाइल घेऊन फरार, परिसरात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com