मुंबईच्या मीरा रोड परिसरात घराचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची मोठी फसवणूक झाली आहे. बिल्डरने चार माळ्यांची बिल्डिंग बांधून पाचव्या मजल्यावरील घरे विकली आहेत. या बिल्डरने फक्त एकाच व्यक्तीची नाही तर अशा अनेक सामान्य नागरिकांची फसवणूक केलीये. (Latest Marathi News)
नेमकं काय घडलं?
एका मराठी वृत्तपत्राने याबाबत बातमी दिलीये. मीरा रोडच्या काशिमीरा महाजनवाडीचा एरीया. या एरीयात जिग्नेश देसाई या बिल्डरने २०१२ साली चार मजल्याची इमारत बांधायला घेतली. ही इमारत पाच माळ्यांची असेल असं ग्राहकांना सांगितलं होतं. टॉप फ्लोअरचा फ्लॅट मिळणार म्हणून ग्राहक खूश झाले. या ग्राहकाने बिल्डर देसाईला २५ लाख रुपये अॅडवान्सही दिला. देसाईने ग्राहकाला तशी कागदतपत्रेही दिली.
पुढे अकरा वर्ष झाली आणि २०२३ उजाडले पण या ग्राहकाला पाचव्या माळ्यावर काही घर मिळालं नाही. ग्राहकाने बिल्डरकडे घरासाठी तगादा लावला. आज देतो, उद्या देतो असं म्हणत बिल्डर ग्राहकांना टाळायचा. शेवटी या ग्राहकाने पोलिसांकडे धाव घेतली आणि बिल्डरविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांकडे गेल्यावर या ग्राहकांना धक्काच बसला. कारण ज्या बिल्डिंगच्या पाचव्या माळ्यावर त्यांनी घर घेतलंय, त्या बिल्डिंगला फक्त चार माळ्यांची परवानगीये. बिल्डर जिग्नेश देसाईने फक्त पाचव्याच नाही तर सातव्या माळ्यावरचेही फ्लॅट्स विकले होते, आणि या ग्राहकांना देसाईने ६० ते ७० लाख रुपयांन चुना लावला होता.
माणूस पै पै जमा करून, आपल्या आयुष्याची कमाई लावून घर घेतो. घर घेणं त्या व्यक्तीचा फक्त आर्थिक निर्णय नसतो. तो एक भावनिक निर्णय असतो. घर घेतल्यामुळे त्या व्यक्तीच्या आणि कुटुंबीयांना एक स्थैर्य लाभतं. पण देसाई सारखे लोक अशा लोकांची फसवणूक करतात, पैसे उकळतात.
घर घेताना ही काळजी घ्या...
महारेरामध्ये त्या बिल्डिंगचा प्रोजेक्ट रजिस्टर आहे का?
अॅडवान्स घेतल्यानंतर तुम्हाली किती दिवसांनतर घराचा ताबा मिळणारे?
त्या बिल्डरकडे बिल्डिंग बांधण्याच्या सगळ्या परवानग्या आहेत का?
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.