HDFC Home Loan Interest Rate : एचडीएफसीच्या ग्राहकांना झटका! कर्जधारकांचा EMI वाढणार

HDFC Bank Rate Hike : HDFC ने मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे.
HDFC Bank
HDFC BankSaam TV
Published On

HDFC Bank Hike MCLR :

देशातील सगळ्यात मोठी खासगी बँक HDFC ने सणासुदीला सुरुवात होण्यापूर्वी ग्राहकांना झटका दिला आहे. HDFC ने मुदतीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे.

बँकेने MCLR १० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.१० टक्क्यांनी वाढवला आहे. बँकेचा MCLR वाढवल्याने गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जाचा EMI हफ्ता वाढेल. त्यामुळे सण सुरु होण्यापूर्वी ग्राहकांच्या खिशावर परिणाम होऊ शकतो.

1. आजपासून नवे दर लागू

MCLR ठरवताना मुदत ठेवी, रेपो दर, ऑपरेशनल दर, रोख राखीव रक्कम यांसारख्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात. रेपो दरातील बदलांचा MCLR च्या दरांवर परिणाम होतो. MCLR बदल कर्जाच्या व्याजदरावर परिणाम करतात ज्यामुळे कर्जदारांचा EMI हफ्ता वाढेल. HDFC बँकेच्या (Bank) वेबसाइटनुसार, नवीन MCLR दर ७ ऑक्टोबर २०२३ पासून लागू झाले आहेत.

HDFC Bank
Gold Silver Price Today (9th October): महागाईसोबत 'युद्ध' सुरू....पहिली झळ सोन्या-चांदीला; मुंबई-ठाण्यासह महाराष्ट्रात किती आहे आजचा भाव? यादीच वाचा

2. एचडीएफसी बँकेचे नवीन दर

  • HDFC बँकेचा MCLR 10bps ने 8.50 टक्क्यांवरुन 8.60 टक्क्यांनी वाढवला आहे.

  • एका महिन्याचा MCLR 15bps ने 8.55 टक्क्यांवरुन 8.65 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

  • तीन महिन्यांचा MCLR देखील पूर्वीच्या 8.85 टक्क्यांवरुन 10 बेसिस पॉइंट्सने 8.80 टक्क्यांनी वाढवला आहे.

  • सहा महिन्यांचा MCLR 9.05 टक्क्यांवरुन 5 bps ने वाढून ९.१० टक्के झाला.

  • एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी MCLR 9.20 टक्के आहे. त्यात 0.05 टक्के वाढ करण्यात आली आहे. पूर्वी तो 9.15 टक्के होता.

  • 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी MCLR 9.20 टक्के आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

  • 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी MCLR 9.25 टक्के आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

3. होम लोन-कार लोन कर्जाचा EMI वाढेल

MCLR मधील वाढीचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यासह सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरांवर दिसून येईल. कर्जदारांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागणार आहे. नवीन कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना अधिक पैसे मोजावे लागतील.

4. बँकेने बेस रेट वाढवला

बँकेने PLR बेस रेट 5 बेसिस पॉईंट्सवरून 15 बेसिस पॉइंट्सवर वाढवला आहे. हे 25 सप्टेंबर 2023 पासून लागू मानले जाते. बेंचमार्क पीएलआर 17.85 टक्के आहे. पूर्वी तो 17.70 टक्के होता. आता बेस रेट 9.25 टक्के झाला आहे. पूर्वी बेस रेट 9.20 टक्के होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com