Maharashtra Politics: 'राज्यात 19 हजार 553 महिला बेपत्ता, अशा प्रश्नांवर गप्प बसायचं का?', सरकारवर शरद पवार कडाडले

Sharad Pawar News: 'राज्यात 19 हजार 553 महिला बेपत्ता, अशा प्रश्नांवर गप्प बसायचं का?', सरकारवर शरद पवार कडाडले
Sharad Pawar News
Sharad Pawar Newssaam tv
Published On

>> रुपाली बडवे

Sharad Pawar On Women's Safety:

''पावसाळी अधिवेशनात अनिल देशमुख यांनी प्रश्न विचारला होता की, 1 जानेवारीपासून 1 मेपर्यंत किती महिला बेपत्ता आहेत, याचं उत्तर मिळालं की 19 हजार 553 महिला बेपत्ता आहेत. याचं रेकॉर्ड देखील आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार शिंदे-फडणवीस सरकारवर कडाकडले आहेत.

आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना पवार असं म्हणाले आहेत.

Sharad Pawar News
Bareilly Crime: अमानुषपणे छळ करून अल्पवयीन मुलीची हत्या; थरारक घटनेनं बरेली हादरलं

ते म्हणाले, ''ही राज्याची स्थिती असेल तर हे अवघड आहे. 18 वर्षा खालील 1453 मुली आहेत आणि उर्वरित महिला आहेत. हे सरकारने लेखी उत्तर दिलं आहे. आपण अशा प्रश्नांवर गप्प बसायचं का?'' (Latest Marathi News)

पवार म्हणाले, ''आपण संरक्षण खात्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांचा विरोध होता. मात्र मी स्वतः मंत्री म्हणून तो निर्णय घेतला. आता तुम्हाला महिला सैन्यात दिसत आहेत, ही जमेची एका बाजूला परिस्थितीत आहे. दुसरीकडे मणिपूर सारखी घटना समोर येते. त्यामुळं अपल्याला जागृत राहावं लागणार आहे. जर आता असा प्रकार कुठं घडला तर आपल्या भगिनी रस्त्यावर उतरायला हवे.''

शरद पवार म्हणाले की, ''आता शाळा समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले यांनी विरोध असताना शाळा काढली आणि आता शाळा बंद करणं योग्य नाही. असं होतं असताना तूम्ही शांत बसत असाल तर हे योग्य नाही.''

Sharad Pawar News
SFJ Chief Pannu: भारतावर 'हमास'सारख्या हल्ल्याची धमकी, PM नरेंद्र मोदींचा उल्लेख केल्यानं टेन्शन वाढलं

'कंत्राटी भरती योग्य नाही'

ते म्हणाले, ''सरकारी नोकरी कमतरता आहे. एका बाजूला नोकऱ्या नाहीत आणि दुसरीकडे रिक्त जागा मोठ्या आहेत. यातच सरकार कंत्राटी पदावर नेमणुका करत आहेत, हे योग्य नाही.

पवार म्हणाले, ''सरकारी नोकरी मुळे कुटुंबात स्वास्थ्य असते. परंतु कंत्राटी पदावर नेमल तर तिथं आरक्षण नाही, त्यामुळं मला खात्री आहे, तिथं महिलाना संधी मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतराव लागेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com