PSFJ Chief Pannu
इस्राइल आणि हमास यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धात आतापर्यंत ३ हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने भारतावर हमाससारखा हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
गुरपतवंत सिंह पन्नू अमेरिकेने बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टीस (एसएफजे) संघटनेचा प्रमुख आहे. यासंदर्भात त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राइल पॅलेस्टाईन युद्धातून बोध घेतला पाहिजे. कारण अशा प्रकारचा हल्ला भारतावरही होऊ शकतो, असं म्हटलं आहे.
पंजाबपासून पॅलेस्टाईनपर्यंत अनधिकृतरित्या कब्जा करणारे लोक प्रतिक्रिया देतात आणि हिंसा हिंसाचाराला जन्म देते. पंजाबवर भारताचा ताबा यापुढेही कायम राहिला तर प्रतिक्रिया द्यावी लागेल आणि यासाठी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार राहतील. तसेच एसएफजे, कॅनडामध्ये झालेल्या आतंकवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचाही बदला घेतला जाईल, अशी धमकी त्याने दिली आहे.
अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप मॅचवरून धमकी देणे आणि संबंध बिघडविण्यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यांनतर काही दिवसांनंतर पन्नूचा हा धमकीचा व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती अहमदाबादचे सायबर क्राइम डीसीपी अजित राजियन यांनी दिली आहे.
अमृतसरमध्ये जन्म झालेल्या पन्नू विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने २०१९ मध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता. त्याच्यावर दहशदवादी कृत्य आणि ती चालवण्यात प्रमुख भूमिकेसह धमकी आणि पंजाब आणि भारतातील काही भागांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण करण्याचे आरोप आहेत. त्यांनतर ३ फेब्रुवारी २०२१ मध्ये विशेष एनआयए न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटी जारी केले होते. मागच्या वर्षी त्याला २९ नोव्हेंबर मध्ये त्याला घोषित गुन्हेगार म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.