भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी शाहिद लतीफची पाकिस्तानमध्ये हत्या झाली आहे. शाहिद लतीफ पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. बुधवारी सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, लतीफला शूटर्सनी पॉइंट ब्लँक रेंजद्वारे गोळ्या घातल्या. या हत्येत स्थानिक दहशतवादी सामील असल्याचा अंदाज आहे.
शाहिद लतीफ हा भारत सरकारच्या मोस्ट वाँटेड यादीत असलेला दहशतवादी होता. NIAने शाहिदविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. शाहिद लतीफ जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. (Latest Marathi News)
2016 मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पठाणकोट येथील एअरबेसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
शाहिदनेच सियालकोटमधून हल्ल्याचा कट रचला होता. त्यानुसार त्याने जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना पठाणकोटमध्ये पाठवले होते. या हल्ल्यात लष्कराचे सात जवान शहीद झाले.
शाहिद लतीफ हा जैश-ए-मोहम्मदचा सियालकोट सेक्टरचा कमांडर होता. भारतविरोधी कट रचण्यासाठी दहशतवाद्यांना भारतात पाठवण्यात त्याचा मोठा वाटा होता. याशिवाय इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केल्याच्या प्रकरणातही शाहिद आरोपी होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.