Accident News : भीषण अपघातानंतर कार फुटपाथवर धडकली, तरी कपल किस करण्यात मग्न; संतापलेल्या स्थानिकांनी दिला चोप, व्हिडिओ व्हायरल!

Chhattisgarh accident news : दारूच्या नशेत भरधाव कार फुटपाथवर आदळून भीषण अपघात झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातानंतर कारमध्ये बसलेले कपल एकमेकांना किस करत होते. नागरिकांनी दोघांना कारमधून बाहेर काढून मारहाण केल्याचे समोर आले आहे. पोलिासांनी याबाबत सखोल चौकशी सुरू केली आहे.
Accident News : भीषण अपघातानंतर कार फुटपाथवर धडकली, तरी कपल किस करण्यात मग्न; संतापलेल्या स्थानिकांनी दिला चोप, व्हिडिओ व्हायरल!
Accident News : भीषण अपघातानंतर कार फुटपाथवर धडकली, तरी कपल किस करण्यात मग्न; संतापलेल्या स्थानिकांनी दिला चोप, व्हिडिओ व्हायरल!saam tv
Published On

दारूच्या नशेत असणाऱ्या एका कपलची कार भीषण अपघातानंतर थेट फुटपाथवर जाऊन धडकली. अपघात झाल्याचे पाहताच स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली, परंतु कारमधील दृश्य पाहून उपस्थितांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. भीषण अपघातानंतरही कारमधील कपल रोमान्स करण्यात मग्न होते. अपघातात कारचा पार चक्काचूर झाला असतानाही त्यांना कारमधून बाहेर ओढून बेदम चोप दिला. ही धक्कादायक घटना छत्तीसगडमधील बिलासपूर येथे मध्यरात्री घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताचा आणि संतप्त जमावाने दिलेल्या चोपाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही भयंकर घटना बिलासपूरच्या सिरगिट्टी परिसरात घडली. मुसळधार पावसात एक भरधाव कार जात होती. कारमधील तरुण आणि तरुणी दोघेही मद्याच्या नशेत धुंद होते. याच मद्याच्या नशेत चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट फुटपाथवर जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार आणि भयंकर होती की, त्यात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. सुदैवाने, फुटपाथवरून जाणारे नागरिक या अपघातातून थोडक्यात बचावले.

Accident News : भीषण अपघातानंतर कार फुटपाथवर धडकली, तरी कपल किस करण्यात मग्न; संतापलेल्या स्थानिकांनी दिला चोप, व्हिडिओ व्हायरल!
VIRAL VIDEO : पाणीपुरीची शेवटची पुरी ठरली ठरली घातक; महिलेचा जबडा अचानक झाला लॉक

या अपघाताच्या वेळी कारमध्ये एक कपल आणि त्यांचे मित्र मिळून एकूण चार जण होते. पुढच्या सीटवर एक तरुणी आणि ड्रायव्हिंग सीटवर तिचा बॉयफ्रेंड बसला होता. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, त्याच वेळी कारमधील कपल एकमेकांना किस करण्यात मग्न असल्याचे आढळले. इतक्या भीषण अपघातानंतरही कारमधील तरुणांनी केलेल्या या अश्लील वर्तनामुळे परिस्थिती चिघळली. संतप्त नागरिकांनी त्या तरुण-तरुणीला कारमधून बाहेर खेचून बेदम मारहाण केली.

Accident News : भीषण अपघातानंतर कार फुटपाथवर धडकली, तरी कपल किस करण्यात मग्न; संतापलेल्या स्थानिकांनी दिला चोप, व्हिडिओ व्हायरल!
VIDEO VIRAL : चहासोबत चवीचवीनं क्रीम पाव खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, तोंडचं पाणी कायमचं पळून जाईल!

दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. परंतु हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची अद्याप अधिकृत खात्री पटलेली नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी या घटनेची दखल घेत सखोल चौकशी सुरू केली आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com