VIRAL VIDEO : पाणीपुरीची शेवटची पुरी ठरली ठरली घातक; महिलेचा जबडा अचानक झाला लॉक

Uttar Pradesh Trending Video : पाणीपुरी खाण्याच्या नादात महिलेने मोठी पुरी तोंडात घेतली आणि तिचा जबडा अचानक लॉक झाला. घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
VIRAL VIDEO : पाणीपुरीची शेवटची पुरी ठरली ठरली घातक; महिलेचा जबडा अचानक झाला लॉक
VIRAL VIDEO : पाणीपुरीची शेवटची पुरी ठरली ठरली घातक; महिलेचा जबडा अचानक झाला लॉकMETA AI
Published On

पाणीपुरी किंवा गोलगप्पे सर्वांच्या आवडीचा विषय आहे. स्ट्रीट फूड्रसमध्ये सर्वात जास्त पाणीपुरी खाल्ली जाते. ती चवीला गोड-तिखट अशी चटकदार असते. पण सगळ्यात शेवटी सुखीपुरी खाल्ल्याशिवाय मन तृप्त होत नाही. पण याच पाणीपुरीचा हट्ट एका महिलेच्या चांगलाच अंगाशी आला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील औरेया जिल्ह्यात संध्याकाळच्या सुमारास भर बाजारात ही घटना घडली. सकाळपासूनच महिलेला पाणीपुरी खाण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे गावातील एका बाजारात महिला पाणीपुरी खाण्यासाठी गेली. पाणीपुरीच्या स्टॉलवर पोहोचताच तिने मोठ्या पुरीची पाणीपुरी बनवण्याच्या ऑर्डर विक्रेत्याला दिल्या. तिने स्वत:पुऱ्या निवडत विक्रेत्याला बनवायला दिल्या. पाणीपुरी खाण्याचा मोह आणि अतिघाई या महिलेच्या चांगल्याच अंगाशी आला. तिला थेट हॉस्पीटल गाठावे लागले. पाणीपुरीच्या १० पुरी खाल्ल्यानंतर शेवटची मोठी पुरी खाताना तिचा जबडा मधेच अडकला. धड तिला खाता ही येईना आणि थुंकता ही येईना अशी तिची अवस्था झाली.

VIRAL VIDEO : पाणीपुरीची शेवटची पुरी ठरली ठरली घातक; महिलेचा जबडा अचानक झाला लॉक
VIDEO VIRAL : चहासोबत चवीचवीनं क्रीम पाव खाताय? मग हा व्हिडिओ एकदा बघाच, तोंडचं पाणी कायमचं पळून जाईल!

उघड्या तोंडाने महिला आजूबाजूच्या लोकांकडे मदत मागू लागली. नागरिक तातडीने महिलेच्या मदतीसाठी धावले, पण मदत कशी करावी हे कोणाला सुचतच नव्हते. थोड्याच वेळात महिलेचा पती घटनास्थळी दाखल झाला, महिलेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्रमाणापेक्षा जास्त जबडा खोलल्याने,अति ताणामुळे महिलेचा जबडामध्येच लॉक झाला. मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात तोंड उघडल्यामुळे हा प्रसंग निर्माण झाला. असे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले.

VIRAL VIDEO : पाणीपुरीची शेवटची पुरी ठरली ठरली घातक; महिलेचा जबडा अचानक झाला लॉक
Fact Check: रेशन कार्ड बंद होणार? जनता लाभांपासून वंचित राहणार?

महिलेचा सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी कमेंट्स करत आश्चर्य व्यक्त केले आहे तर काही नेटकऱ्यांनी जास्त खाताना जास्त घाई न करू नका असा सल्ला देखील दिला आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com