भारतासह 27 देशांचं टेन्शन वाढलं! डोनाल्ड ट्रम्प पुन्हा टॅरिफचा दणका देण्याच्या तयारीत; आंतरराष्ट्रीय राजकारणात काय घडतंय?

Donald Trump New tariff Announcement On China And European Union: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासन चीन, युरोपीय संघासह १६ देशांवर नवीन टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचा जागतिक व्यापार आणि भारतावर काय परिणाम होणार?
Trump tariff policy 2026
Trump tariff policy 2026saam tv
Published On: 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा मोठा झटका देणार असल्याचे सांगितले जात आहे. भारत चीन, युरोप यांच्यासह 16 देशांवर आयात शुल्क टॅरिफ वाढवण्याची तयारी करत आहे. येणाऱ्या काही दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधि कार्यालयाकडून या 16 देशांमध्ये उद्योगांना दिल्या जाणाऱ्या सरकारी अनुदानाबाबत अनेक महिन्यांपासून तपास सुरू होता. या तपासाचा निष्कर्ष लवकरच जाहीर केला जाऊ शकतो.

Trump tariff policy 2026
Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! प्रवाशांनी खचाखच भरलेली बस ट्रकला धडकली, १३ जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने रद्द केले होते ट्रम्प यांचे टॅरिफ

ट्रम्प सरकारने हा निर्णय यापूर्वी लागू केलेल्या व्यापक आयात शुल्कांच्या जागी नवीन शुल्क लागू करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. गेल्या वर्षी एप्रिल 2025 मध्ये ट्रम्प यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादले होते. मात्र, अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारीमध्ये हे शुल्क असंवैधानिक ठरवत रद्द केले होते.

Trump tariff policy 2026
Self Medication: भारतात 61 टक्क्यांहून अधिक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतात औषधं; तरुणांमध्ये प्रमाण सर्वाधिक, रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर

सरकारी अनुदानामुळे अमेरिकन कंपन्यांचे नुकसान?

व्हाइट हाऊसच्या म्हणण्यानुसार, संबंधित देशांमध्ये उद्योगांना दिल्या जाणाऱ्या सरकारी अनुदानामुळे उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होत आहे. परिणामी, बाजारात कमी किमतीच्या उत्पादनांचा पुरवठा वाढत असून अमेरिकन कंपन्यांना त्याचा फटका बसत आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याची तयारी सुरू आहे.

Trump tariff policy 2026
पुण्यात धक्कादायक निकाल! पदवीधरमध्ये मोठा उलटफेर, तर शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचा विजय निश्चित

प्रस्तावित टॅरिफचा दर अद्याप स्पष्ट झालेला नाही. मात्र, यंदाच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या १० ते १२.५ टक्के आयात शुल्काव्यतिरिक्त हे नवीन शुल्क लागू केले जाण्याची शक्यता आहे. चीनसह अनेक देशांनी यापूर्वीच अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी लागू केलेल्या तात्पुरत्या आयात शुल्कांची मुदत संपत असतानाच अमेरिकेकडून नव्या शुल्कांची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीनसह इतर प्रमुख व्यापारी भागीदारांमधील व्यापार संबंधांमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.