

संयुक्त अरब अमिरातीमध्ये मंगळवारी भीषण रस्ते अपघात झाला. रास अल खैमाह येथे भरधाव बसने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये भारतीय नागरिकांसह १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर १४ जण गंभीर जखमी झाले. दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासाने या दुःखद घटनेची माहिती दिली. भारतीय दूतावासाने पीडितांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे आणि सर्वतोपरी मदत पुरवण्यासाठी स्थानिक प्रशासनासोबत मिळून काम करत असल्याचे सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा भीषण अपघात मंगळवारी रास अल खैमाह येथील अल वतन महामार्गावर झाला. ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चालकाने ट्रक महामार्गाच्या कडेला उभा केला. याचवेळी ४१ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या पुढील भागाचा चुराडा झाला.
या भीषण अपघातामध्ये ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या आणखी दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा १३ वर पोहचला. अपघातामध्ये १४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या भीषण अपघातामध्ये ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या आणखी दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा १३ वर पोहचला. अपघातामध्ये १४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दुबईमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे . त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'रस अल खैमाह येथे भीषण रस्ते अपघात झाला. ज्यामध्ये भारतीय नागरिकांसह अनेक जणांचा मृत्यू झाला.' दूतावासाने पीडित कुटुंबांना मदत आणि माहिती देण्यासाठी ८००-४६३४२ हा २४-तास टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.