Accident: स्वामींच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, अपघातात मुंबईतील तिघांचा मृत्यू

Solapur Accident: सोलापूरमध्ये भीषण रस्ते अपघात झाला. अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी जात असताना ही घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
Accident: स्वामींच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, अपघातात मुंबईतील तिघांचा मृत्यू
Solapur AccidentSaam Tv
Published On: 

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. भरधाव कारला कंटेनरने धडक दिली. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सोलापूर पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील शेटफळ ते तेलंगवाडी गावादरम्यान ही अपघाताची घटना घडली. कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. अपघातात ८ वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोन जण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. पार्थ तुषार भारंबे (वय ८ वर्षे), विलास चांगु भारंबे (वय ६६ वर्षे) आणि शोभा विलास भारंबे (वय ६३ वर्षे) यांचा मृत्यू झाला. तर तुषार विलास भारंबे आणि पूनम तुषार भारंबे हे पती-पत्नी जखमी झाले आहेत.

Accident: स्वामींच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, अपघातात मुंबईतील तिघांचा मृत्यू
Accident News : भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार भारंबे कुटुंबीय अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या देवदर्शनासाठी जात होते. आज सकाळी ते कल्याणहून अक्कलकोटच्या दिशेने निघाले होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास मोहोळ तालुक्यात त्यांच्या कारने कंटेनरला धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामध्ये भारंबे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला त्यामुळे भारंबे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी झालेत. जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Accident: स्वामींच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला, अपघातात मुंबईतील तिघांचा मृत्यू
Accident: देवदर्शनापूर्वीच भाविकांवर काळाचा घाला, अनियंत्रित कार नदीत कोसळली; चौघांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.