Accident News : भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

Rajasthan Accident News : राजस्थानमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने तीन तरुणांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू.
Rajasthan Accident News
Rajasthan Accident NewsAI Image
Published On: 
Summary
  • राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील आबूरोड परिसरात भीषण रस्ते अपघात

  • मंगळवारी रात्री मावल कटजवळ ट्रकने दुचाकीला जोरदार धडक

  • दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तीन तरुणांचा या अपघातात मृत्यू

राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात रस्ते अपघातांची मालिका सुरूच असून, आबूरोड परिसरात घडलेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री रीको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मावल कटजवळ हा अपघात घडला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तिघांना आपला जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री एक ट्रक आबूरोड येथून पालनपूरच्या दिशेने जात होता. त्याचवेळी मावल कटजवळ ट्रकने समोरून नव्हे, तर त्याच दिशेने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवर तीन तरुण प्रवास करत होते. धडक इतकी जोरदार होती की तिघेही रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले.

Rajasthan Accident News
Rain Update : महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस! १३ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा; वाचा A to Z अपडेट्स

अपघाताची माहिती मिळताच रीको पोलीस ठाण्याचे अधिकारी आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी तरुणांना तातडीने रुग्णवाहिकेतून आबूरोड येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

Rajasthan Accident News
Pune : पुणे पोलीस दलात खळबळ! आयुक्तांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घालणारा पोलीस कर्मचारी निलंबित

मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह रुग्णालयाच्या शवागृहात ठेवले. विशेष म्हणजे, तिन्ही तरुणांची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यांची नावे आणि पत्ते शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू असून ट्रक आणि चालकासंदर्भातील माहिती गोळा केली जात आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचाही शोध घेतला जात आहे.