Pune Accident: पुण्यात मध्यरात्री अपघाताचा थरार! भरधाव कार महामार्गावर उलटली, ३ तरुणांचा जागीच मृत्यू

Pune Accident News: अहिल्यानगर- पुणे महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये ३ तरुणांचा मृत्यू झाला तर २ तरुण गंभीर जखमी झालेत.
Pune Accident: पुण्यात मध्यरात्री अपघाताचा थरार! भरधाव कार महामार्गावर उलटली, ३ तरुणांचा जागीच मृत्यू
Pune AccidentSaam Tv
Published On: 

सचिन जाधव, पुणे

पुण्यामध्ये भरधाव कारला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ३ तरुणांचा जागीच मृत्यू झाल तर दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघाताची ही घटना पुणे-अहिल्यानगर महामार्गावर घडली. भरधाव कार डिव्हायडरला धडकली त्यानंतर ती दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन उलटली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आणि कारमधील ३ तरुणांनी जागीच प्राण सोडले. गंभीर जखमी झालेल्या २ तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली हद्दीत विठ्ठलवाडी कमानीजवळ मध्यरात्री १.२५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर ओलांडून महामार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेवर उलटली. त्यानंतर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये सुमारे ६० ते ७० मीटर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला कारने जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये ३ तरुणांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले.

या भीषण अपघातात ओमकार अजय सूर्यवंशी (वय २४ वर्षे), शंकर वासुदेव ढोळे (वय २२ वर्षे) आणि मयूर सतीश औटी (वय २६ वर्षे) या ३ तरुणांचा मृत्यू झाला. तिघेही वाघोली येथील फूलमळा रोड परिसरातील रहिवासी होते. या अपघातामध्ये आशुतोष नंदकुमार मरकड (वय २८ वर्षे) आणि प्रणय भरत शिंदे (वय २४ वर्षे) हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना वाघोली येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृत तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलेत. वाघोली पोलिसांनी या घटनेची नोंद करत पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातामुळे ३ तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे वाघोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.