Shocking News: भयंकर! भटके कुत्रे मागे लागताच चिमुकली घाबरली; जागेवरच सोडला जीव, मन सुन्न करणारी घटना

Dog Attack on Child: कुत्रे भुंकत असल्याचं पाहून चिमुकलीने जीवाच्या आकांताने धाव घेतली. मात्र, धावता-धावता ती जमिनीवर कोसळली.
Dog Attack on Child
Dog Attack on ChildSaam TV
Published On

Dog Attack on Child

अंगणात खेळत असलेल्या एका चिमुकलीवर अचानक भटक्या कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कुत्रे भुंकत असल्याचं पाहून चिमुकली प्रचंड घाबरली. तिने जीवाच्या आकांताने घराकडे धाव घेतली. मात्र, धावता-धावता ती जमिनीवर कोसळली. या घटनेत चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाला. मन सुन्न करणारी ही घटना चंदीगड शहरातील मनीमाजरा परिसरात घडली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dog Attack on Child
Coroana New Variant: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची 3 राज्यात एन्ट्री; देशभरात आतापर्यंत 'इतक्या' रुग्णांची नोंद

या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मागील काही महिन्यांपासून चंदीगड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहेत. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर अचानक भटके कुत्रे हल्ला करीत आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये आजवर अनेकजण जखमी झाले आहेत.

यामध्ये लहान मुले, महिला तसेच दुचाकीस्वारांचा समावेश आहे. महिलांना तसेच लहान मुलांना रस्त्यावर एकटं पाहून अचानक भटके कुत्रे हल्ले करीत आहेत. याशिवाय दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तींवर देखील भटके कुत्रे हल्ला करीत आहेत.

या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी, मागणी शहरातील नागरिक करीत आहेत. अशातच बुधवारी दुपारच्या सुमारास मनीमाजरा परिसरात खेळत असलेल्या दुसरीत शिकणाऱ्या एका चिमुकलीवर अचानक भटके कुत्रे धावून आले.

कुत्रे आपल्याकडे येत असल्याचे पाहून चिमुकली प्रचंड घाबरली. घराकडे पळत असताना ती खाली रस्त्यावर पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, कुत्र्यांच्या दहशतीमुळेच घाबरून चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत असून परिसरात घबराटीचं वातावरण आहे.

Dog Attack on Child
Weather Update: स्वेटर मफलर तयार ठेवा, राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पुढील ४ दिवसांत कापरं भरणारी हुडहुडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com