कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट ‘जेएन.१’ ने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ३ राज्यात या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटक आणि गोव्यानंतर आता महाराष्ट्रातही ‘जेएन.१’ व्हायरसने शिरकाव केला असून सिंधुदुर्गातील ४१ वर्षीय व्यक्तीला संसर्ग झाला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
‘जेएन.१’ व्हेरिएंट गेल्या काही आठवड्यांमध्ये सर्वात वेगाने पसरणाऱ्या व्हायरसपैकी एक बनला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, या सब व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण गोव्यात सापडले आहेत. देशभरात या व्हेरिएंटची संख्या २१ वर पोहचल्याने चिंतेत वाढ झाली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन-१ चा पहिला रुग्ण ८ डिसेंबर रोजी आढळला होता. केरळमधील एका व्यक्तीला या व्हेरिएंटची लागण झाली होती. त्यानंतर एकाच दिवसांत ३ जणांचा मृत्यू झाल्याने सरकार अलर्टवर आले.
दुसरीकडे केरळपाठोपाठ महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये देखील या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा जेएन वनचा नवीन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे.
१९ वर्षीय तरुणीला नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याने तिच्यावर कळवा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या या तरुणीची प्रकृती अत्यंत नाजूक असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे सिंधुदुर्गातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. येथील एका ४१ वर्षीय पुरुषाला या व्हेरिएंटची लागण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.