Delhi protesters allege police assault during detention : शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप जखमी आंदोलकांनी केला आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आदोलकांची व्याथा सर्वांसमोर आणली. आंदोलक विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले. "आम्ही शांततेत आंदोलन करत होतो, तरीही पोलिसांनी आम्हाला बेदम मारहाण केली," अशी आपबिती पीडितांनी माध्यमांशी बोलताना सांगितली.
दिल्लीतील आंदोलक केरळाची आदिरा यांनी पोलिसांच्या दादागिरीवर तीव्र संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "सुमारे ७ ते ८ पोलिसांनी मिळून आम्हाला घेरले आणि मारहाण केली. चंचल नावाच्या महिला कॉन्स्टेबलने तर अत्यंत क्रूरपणे मारले. मारहाण करताना 'आता कुठे गेला तुमचा नेता?' असा सवाल विचारत त्या आम्हाला मारत होत्या."
गळा दाबला, लाथा-बुक्क्यांनी मारले!
इतर आंदोलकांनीही पोलिसांच्या अमानुष कृत्याचा पाढा वाचला. "पोलिसांनी आमचा गळा दाबला, काठ्यांनी मारहाण करत रस्त्यावरून फरफटत नेले. एवढेच नाही तर ७ ते ८ जणांनी पकडून लाथा-बुक्क्यांनी मारले आणि प्रायव्हेट पार्टवरही गंभीर वार केले. आमचे केस ओढले" असा धक्कादायक आरोप जखमी आंदोलकांनी केला आहे.
आम्ही अत्यंत शांततेत आमचे मागण्यांसाठी आंदोलन करत असताना पोलिसांनी केलेले हे वर्तन अत्यंत संतापजनक असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. आरएसएसचे गुंड पोलिसांना आम्हाला अटक करायला सांगत होते. आम्हाला जेल व्हॅनमध्ये टाकून रक्त येईपर्यंत मारत होते.
आमचे फोन काढून घेतले जात होते. फोनचा पासवर्ड विचारून सर्वकाही फोन तपासला जात होता. काही लोकांचे फोन माघारीही दिला नाही. शिविगाळ दिली. धमक्याही दिल्या. आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डिटेनशनमध्ये मारले जातेय, शिव्या दिल्या जात आहे. वेगवेगळे गुन्हे दाखल केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.