CM Kejriwal ED Summons: CM अरविंद केजरीवाल ईडी चौकशीला सामोरे जाणार, तारीखही दिली, पण...

CM Kejriwal 8th ED Summon: कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी सीएम केजरीवाल आता ईडीच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत. या अगोदर ईडीने त्यांना ८ समन्स बजावले आहेत.
 CM Kejriwal ED Summons
CM Kejriwal ED SummonsSaam Tv

CM Kejriwal News

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी (Delhi News) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर होणार होते, मात्र त्यांनी हजर राहण्यास नकार दिला आहे. सीएम केजरीवाल सातत्याने समन्स बेकायदेशीर ठरवत आहेत. आज दिल्ली विधानसभेचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यादरम्यान सीएम केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. (latest marathi news)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना आज कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हजर राहण्यासाठी बोलावलं होतं. सीएम केजरीवाल यांनी आजही सुनावणीला हजर राहण्यास नकार दिला आहे. ईडीने त्यांना आठवं समन्स बजावलं होतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीएम केजरीवाल यांना ईडीचं समन्स

याआधी केंद्रीय एजन्सीने त्यांना सात नोटिसा बजावल्या (CM Kejriwal ED Summon) होत्या, पण कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे, असा आरोप आम आदमी पार्टी करत आहे.

ईडीच्या आठव्या समन्सला उत्तर देताना सीएम केजरीवाल म्हणाले की, ईडीचं समन्स बेकायदेशीर (CM Kejriwal 8th ED Summon) आहे. परंतु, तरीही ते उत्तर देण्यास तयार आहेत. त्यांनी १२ मार्चनंतरची तारीख मागितली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ईडीच्या प्रश्नांची उत्तरे देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 CM Kejriwal ED Summons
Delhi Confidence Motion: आपकडे 62 आमदार, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी केवळ 54 का होते उपस्थित? केजरीवाल यांनी सांगितलं कारण

सीएम केजरीवाल यांची ईडी चौकशी

यापूर्वी सीएम केजरीवाल यांनी ईडीचे समन्स अनावश्यक (Delhi Liquor Policy) असल्याचं म्हटलं होतं. न्यायालयाने या संदर्भात आदेश दिल्यासच आपण ईडीसमोर हजर राहू, असं त्यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हजर न झाल्यानं आता ईडीनेही न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायालयाने सीएम केजरीवाल यांना १६ मार्चला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली विधानसभेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे वैयक्तिकरित्या हजर राहण्यास असमर्थता व्यक्त करत केजरीवाल यांनी (CM Kejriwal News) न्यायालयीन कामकाजात भाग घेतला नव्हता. आठ समन्सनंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडी चौकशीला सामोरे जाणार आहेत.

 CM Kejriwal ED Summons
Arvind Kejriwal: सोमवारी आधी नोटीस येईल, नंतर केजरीवाल यांना अटक होणार; आप नेत्याचा मोठा दावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com