Sharad Pawar On Kejriwal : केजरीवाल यांना एक-दोन दिवसात अटक होणार? शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Sharad Pawar On Arvind Kejriwal : दिल्लीतील कथीत मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहेत. तरीही केजरीवाल चौकशीला गेलेले नाहीत. त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे, शरद पवार यांनीही यावर भाष्य केलं आहे.
Sharad Pawar On Kejriwal
Sharad Pawar On Kejriwal Saam Digital
Published On

Sharad Pawar On Kejriwal

दिल्लीतील कथीत मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहेत. तरीही केजरीवाल चौकशीला गेलेले नाहीत. त्यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल उत्तम राज्य चालवतात, मात्र त्यांना एक दोन दिवसात अटक होईल, असा गौप्यस्फोट केला असून चिंता देखील व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आस्था नाही. भाजपला ज्या ज्या विरोधी पक्षातील नेत्यांनी विरोध केला, त्यांच्या मागे ईडी लावण्यात आली. आता तुरुंगात टाकलं जात आहे. आजच्या राज्यकर्त्यांना मनासारखी भूमिका घेणाऱ्या लोकांची गरज आहे. विरोधात गेले की तुरुगांत टाकतात. अशोक चव्हाण यांना कॉंग्रेसने मुख्यमंत्री केलं ते विसरून ते भाजपात गेले. तुरुंगात जाण्यापेक्षा सोबत गेले. आजचा नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा, अशी अवस्था राजकारणाची झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

काळ्या आईशी इमान राखणारे संकटात

आज देशात वेगळं चित्र आहे. शेतीशी इमान राखणारे तुम्ही आहात. मात्र आज देशात कुठे गेलं तरी काळ्या आईशी इमान राखणारे संकटात असलेले दिसतात. घाम गाळून कष्ट करून मेबादला मिळत नाही. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती आहे. शेतकरी कर्जबाजारी होत आहे सन्मानाने जगण्याची इच्छा शेतकऱ्याची आहे. १० पूर्वी शेतीची जबाबदारी माझ्याकडे होती. पहिल्या फाईलमध्ये देशात गहू तांदुळसाठा नव्हता. त्यावेळी झोप आली नाही. देशाची शेतीप्रधान ओळख असताना धान्य परदेशातून आणायचं ही परिस्थिती समोर होती. ती यशस्वीपणे सांभाळली आहे.

Sharad Pawar On Kejriwal
India China Border Conflict : भारत-चीनमध्ये कमांडर स्तरावर बैठक; LAC वर काय आहे परिस्थिती? जाणून घ्या

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मी उभा केला. यांना निवडून आणलं. हे उमेदवार माझ्या नावाचा फोटो घेऊन निवडणून आले आणि आता सोडून गेले. पूर्वी माझ्यासोबत काम करणारे आज नाहीत पण त्यांच्यात निष्ठा होती. काय कमी केलं विधानसभा, मंत्री अनेक पद दिली, ऐवढं सर्व दिलं, तरी पाच टक्के तरी निष्ठा ठेवायला हवी होती. यापुढे नागरिक तुमच्या बाबत निष्ठा ठेवणार नाहीत, असं म्हणतं दिलीप वळसेपाटलांना पवारांना सुनावलं.

Sharad Pawar On Kejriwal
Cashew nuts : काजू उत्पादक, प्रक्रिया उद्योगांना दिलासा देणारी बातमी! ब्राझीलच्या तंत्रज्ञानावर काय म्हणाले अजित पवार? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com