India China Border Conflict : भारत-चीनमध्ये कमांडर स्तरावर बैठक; LAC वर काय आहे परिस्थिती? जाणून घ्या

India China Border Conflict : भारत आणि चीनमध्ये 19 फेब्रुवारी रोजी कोर कमांडर स्तरावरील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची ही 21 वी फेरी होती. भारताच्या चुशुल-मोल्डो सीमेवर ही बैठक झाली.
India China Border Conflict
India China Border ConflictSaam Digital
Published On

India China Border Conflict

भारत आणि चीनमध्ये 19 फेब्रुवारी रोजी कोर कमांडर स्तरावरील बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची ही 21 वी फेरी होती. भारताच्या चुशुल-मोल्डो सीमेवर ही बैठक झाली. मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूंनी LAC आणि पूर्व लडाखमधील इतर भागात शांतता प्रस्थापित करण्याबाबत एकमत झालं. यासोबतच मागच्या बैठकीत मांडलेल्या मुद्यांवरही चर्चा करण्यात आली.

दोन्ही देशांनी लष्करी संवाद आणि विचारांची देवाणघेवाण करण्यात गती कायम ठेवण्याचं मान्य केलं. दोन्ही बाजूंनी मध्यंतरी सीमावर्ती भागात शांतता राखण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आणि वादविवाद सोडवण्यावरही भर दिला.

गेल्या वर्षीही अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली होती

गेल्या वर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये दोन्ही देशांदरम्यान 20 वी बैठक झाली होती. या बैठकीत पश्चिम भागातील LAC सोबतच इतर अनेक समस्या आणि त्यावरील उपायांवर चर्चा करण्यात आली. यापूर्वी एप्रिलमध्ये झालेल्या लष्करी चर्चेदरम्यान भारताने डेपसांग आणि डेमचोकमधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी चीनवर दबाव आणला होता. मात्र या चर्चेतून कोणताही मार्ग निघाला नव्हता.

India China Border Conflict
Pakistan Economic Crisis : पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ३ अब्ज डॉलरचं कर्जही संपलं, पुढच्या ३० दिवसात काय घडणार? जाणून घ्या

पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांमध्ये संघर्ष

मागील काही वर्षांपासून पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांदरम्यान वाद सुरू आहे. दोन्ही देशांनी आपले सैन्य या भागात तळ ठोकून आहे. चिनी सैनिक अनेकदा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यावर भारताने अनेकदा आक्षेप घेतला आहे. सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये अनेकवेळा चकमकी देखील झडल्या आहेत.

India China Border Conflict
Lok Sabha Election 2024: सपा आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेस यूपीत इतक्या जागा लढवणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com