Delhi Confidence Motion: आपकडे 62 आमदार, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी केवळ 54 का होते उपस्थित? केजरीवाल यांनी सांगितलं कारण

Arvind Kejriwal On Delhi Confidence Motion: दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या (AAP) सरकारने आज पुन्हा एकदा विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले आहे.
Arvind Kejriwal On Delhi Confidence Motion
Arvind Kejriwal On Delhi Confidence MotionSaam Tv
Published On

Arvind Kejriwal On Delhi Confidence Motion:

दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या (AAP) सरकारने आज पुन्हा एकदा विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले आहे. केजरीवाल यांनी शुक्रवारी दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला होता. त्यावर आज सभापतींनी चर्चा करून मतदान केले. ज्यामध्ये आपचा सहज विजय झाला. 70 जागांच्या दिल्ली विधानसभेत आपचे 62 आमदार आहेत आणि विरोधी भाजपकडे फक्त 8 आमदार आहेत.

दिल्ली विधानसभेने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला. सभागृहात विश्वासदर्शक ठरावावरील मतदानादरम्यान आप सरकारच्या बाजूने 54 मते पडली, तर विरोधात फक्त एक मत पडले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Arvind Kejriwal On Delhi Confidence Motion
Eknath Shinde: एक पत्र आलं अन् ५० कोटी मागितले; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप; नेमकं काय म्हणाले?

आज विश्वासदर्शक ठरावावर मतदान करताना दोन्ही पक्षांचे केवळ 55 आमदार सभागृहात उपस्थित होते. आपचे 62 पैकी 54 आमदार सभागृहात उपस्थित होते. तर विधानसभेच्या कामकाजातून निलंबित करण्यात आल्याने भाजपचे 8 पैकी 7 आमदार सभागृहाबाहेर राहिले. यात फक्त विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिधुरी यांनीच चर्चेत भाग घेतला आणि विश्वासदर्शक ठरावावर मतदान केले. (Latest Marathi News)

म्हणून सभागृहात आपचे फक्त 54 आमदार उपथित होते...

यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, सभागृहात आमच्याकडे बहुमत आहे. मात्र भाजप आपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याने हा विश्वास प्रस्ताव आवश्यक होता. आमचा एकही आमदार फुटला नाही, असे केजरीवाल म्हणाले. आज आमचे एकूण 62 आमदारांपैकी 54 आमदार सभागृहात उपस्थित आहेत. 2 आजारी आहेत, 3 आमदार दिल्लीबाहेर आहेत. 2 आमदार मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र तुरुंगात असून एका आमदाराच्या घरी लग्नकार्य असल्याने ते येऊ शकले नाही.

Arvind Kejriwal On Delhi Confidence Motion
Eknath Shinde: वारसा सांगणाऱ्यांनी आरसा पाहावा... शिवसेनेच्या महाअधिवेशनात CM शिंदेंचे धडाकेबाज भाषण; उद्धव ठाकरेंवर बरसले

केजरीवाल म्हणाले, "आमच्या आमदारांशी संपर्क साधत त्यांनी आमच्या सात आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. या आमदारांनी आज सभागृहात सांगितले की, त्यांच्याशी (भाजपने) संपर्क साधला होता. त्यांना (भाजप) पुरावे हवे आहेत. आम्हालाही पुरावे दाखवायचे आहेत. मात्र आम्ही पुरावे कसे दाखवू? कोणतीही व्यक्ती सतत टेपरेकॉर्डर बाळगत नाही, असंही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com