Eknath Shinde: वारसा सांगणाऱ्यांनी आरसा पाहावा... शिवसेनेच्या महाअधिवेशनात CM शिंदेंचे धडाकेबाज भाषण; उद्धव ठाकरेंवर बरसले

Shivsena Shinde Group Adhiveshan Kolhapur: हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मग साहेब सांगत होते तेव्हा काँग्रेसला का ला़ंब ठेवलं नाही? सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत का गेलात? आम्ही सांगत होतो पण ऐकलं नाही. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी धाडस केलं, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Uddhav Thackeray vs Eknath ShindeSaam TV
Published On

सुरज सावंत, प्रतिनिधी|ता. १७ फेब्रुवारी २०२४

CM Eknath Shinde Speech:

शिवसेना शिंदे गटाचे महाअधिवेशन सध्या कोल्हापूरमध्ये सुरू आहे. आज या महाअधिवेशनाचा दुसरा दिवस. आज महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेते तसेच कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

"कोल्हापूर आणि बाळासाहेबांचं एक अतूट नातं आहे. त्यामुळेच त्याच्या आशीर्वादाने आपण पून्हा शिवसेना नव्याने उभी करतोय. आपला पक्ष मोठा होतोय हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आपला धनुष्यबाण नाव हे आपल्याकडे आहे ही जमेची बाजू आहे. बाळासाहेब यांचे विचार पुढे नेहतोय त्यामुळेच आपला विजय निश्चित आहे. आपल्या गर्दीमुळे शिवसेना कुणाची हे सांगायची आवश्यक्यता नाही," असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यावेळी म्हणाले.

आत्मचिंतन कुणी करावं?

"आज राम मंदीरावेळी बाळासाहेब असते तर मोदी शहांचे त्यांनी कौतुक केलं असतं. आमचे अनेक आमदार शिवसेनेत आले येत आहेत. हजारो सैनिक का येत आहेत. जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत चांगला, गेला की गद्दार व कचरा. एक दिवस हम दो हमारे दो ची वेळ येईल, आत्मपरीक्षण आत्मचिंतन कुणी केलं पाहिजे, हे त्यांना समजायला पाहिजे.." असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Supriya Sule News: सुप्रिया सुळे संसदेत 'खासदार नंबर १', सलग दुसऱ्यांदा ठरल्या संसद महारत्न!

"हिंदुत्व सोडलं नाही म्हणता मग साहेब सांगत होते तेव्हा काँग्रेसला का ला़ंब ठेवलं नाही? सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत का गेलात? आम्ही सांगत होतो पण ऐकलं नाही. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी धाडस केलं. माझ्यासोबत ५० आमदार आले काही मंत्र्यांनी पायउतार केले. आम्ही बाळासाहेबांचे विचारापासून दूर जात असल्याने आम्ही सत्तेतून पाय उतार झालो," असे एकनाथ शिंदे म्हणाले.

आरसा पाहावा...

"एका पक्ष प्रमुखाला हा सत्तेचा मोह आज नाही २०१४ पासून होता. मी पदाला हापापलो नव्हतो, मला सांगितलं असतं तर मी तसं वातावरण केलं असतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिसतात तसे नाही, त्याच्या मागे अनेक चेहरे आहेत. सत्तेच्या एका खुर्चीपाई यांनी बेईमानी केली. तुमच्या परिवारावर काही घडल़ तेव्हा तुम्ही अशोक चव्हाण व अजित पवारांसोबत गेलात. आजचं अधिवेशन बघा शेवटची खुर्ची भरलेली आहे, वारसा सांगणाऱ्यांनी कधी तरी आरसा पाहावा," अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टीका केली. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Maratha Andolan : शिवनेरीवर येताना आरक्षणाचा अद्यादेश घेऊन या; अन्यथा... मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com