Arvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढल्या, कोर्टाकडून हजर राहण्याचे आदेश

Arvind Kejriwal summons by Delhi Court : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोर्टानं केजरीवाल यांना १६ मार्च रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
Arvind Kejriwal summons by Delhi Court
Arvind Kejriwal summons by Delhi CourtSAAM TV
Published On

Arvind Kejriwal summons :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केजरीवाल यांना आठ वेळा समन्स पाठवूनही हजर न झाल्याने अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीच्या कोर्टात धाव घेतली. त्यावर कोर्टानं केजरीवाल यांना १६ मार्च रोजी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ईडीने समन्स पाठवूनही हजर न झाल्यामुळं संबंधित तपास यंत्रणेने कोर्टात तक्रार दाखल केली. कोर्टाने ईडीची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर केजरीवाल यांना १६ मार्चला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीतील मद्यधोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering case) चौकशीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. तब्बल आठ वेळा ईडीकडून (ED) समन्स बजावण्यात आले आहे. पाच समन्स बजावूनही हजर न झाल्याबद्दल कोर्टाने याआधी केजरीवाल यांना ७ मार्चला समन्स बजावून १७ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

Arvind Kejriwal summons by Delhi Court
Maharashtra Politics : महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित; ठाकरे गट २०, काँग्रेस २०, शरद पवार गट ८ जागा लढणार?

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी राज्याचा अर्थसंकल्प असल्याने कोर्टाकडे विनंती करत प्रत्यक्ष हजर राहण्यापासून सूट मागितली होती आणि १६ मार्च रोजी हजर राहण्यासंदर्भात हमी दिली होती. १७ फेब्रुवारी रोजी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टासमोर हजर झाले होते.

कोर्टाने समन्स बजावले

ईडीने कलम १९० (१) (ए) अंतर्गत तक्रार दिली आणि मुख्यमंत्र्यांवर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट २००२ च्या अनुच्छेद ५० अंतर्गत समन्सचे पालन न केल्याचा आरोप केला. ईडीकडून एएसजी एसव्ही राजू आणि विशेष सरकारी वकील जोहेब हुसैन यांनी बाजू मांडली. कोर्टाने बाजू ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांना १६ मार्च रोजी हजर राहण्यासंदर्भात आदेश दिले.

Arvind Kejriwal summons by Delhi Court
CM Kejriwal ED Summons: CM अरविंद केजरीवाल ईडी चौकशीला सामोरे जाणार, तारीखही दिली, पण...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com