Maharashtra Politics : महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित; ठाकरे गट २०, काँग्रेस २०, शरद पवार गट ८ जागा लढणार?

Mahavikas Aghadi Meeting : बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Saam Tv

सचिन गाड | मुंबई

Mumbai News :

महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भातील महत्त्वाची बैठक बुधवारी पार पडली. बैठकीत महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील हॉटेल फोर सिझन्स येथे ही बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. (Latest Political News)

बैठकीत जागावाटपाचा २०-२०-८ अशा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट २० जागा आणि काँग्रेस देखील २० जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला ८ जागा देण्यात येणार आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mahavikas Aghadi
Loksabha Election 2024 : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?; भाजप ३४, शिवसेना १०, राष्ट्रवादी ४ जागा लढवण्याची शक्यता

शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्या कोट्यातून वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी २ जागा वंचित बहुजन आघाडीला सोडली जाणार असल्याची चर्चा आहे. तर शरद पवार गट त्यांच्या कोट्यातून दोन जागा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्ष आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षासाठी सोडल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सर्व ४८ जागांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सर्व नेत्यांना दिली. चर्चा सकारात्मक झाली असली तर येत्या ९ मार्चच्या पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपावर शिकामोर्तब होण्याची शक्यता आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सर्व पुढच्या बैठकीत ठरेल, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Mahavikas Aghadi
Uddhav Thackeray: उध्दव ठाकरे धाराशिव दौऱ्यावर, जनसंवाद मेळाव्यातून शिवसैनिकांना घालणार भावनिक साद

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला?

हायुतीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी खुद्द अमित शाह मुंबईत आले होते. दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही चर्चा केली. यावेळी ३४-१०-४ असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com